जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहर अत्यावश्यक सेवा वगळता रहाणार बंदच

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोनाच्या देशातील संचारबंदीचा दुसरा टप्पा नुकताच संपला असला तरी नगर जिल्यातील पाथर्डी तालुक्यात नव्याने कोरोना रुग्ण आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुका अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ववत बंद ठेण्याचा निर्णय घेतला आहे.केवळ शहरात आठवड्यातील रविवार,बुधवार,आणि शुक्रवार या तीन दिवशी फक्त सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत किराणा व भाजीपाला खरेदी विक्री सुरु रहाणार असल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

सरकारने तांबड्या विभागातील दुकाने वगळता अन्य दोन ठिकाणची दुकाने उघडण्यास अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे.तथापि कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नगर जिल्ह्यात पाथर्डीस आणखी एक रुग्ण कोरोना लागण झालेला आढळल्याने सावधानता पाळत सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकाराच्या अधीन राहून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगर जिल्ह्यात पूर्ववत स्थिती ठेवण्याचा निर्णय काल उशिरा घेतला आहे.याबाबत नागरिकांना पुरेशी माहिती नसल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरु झाली होती

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १६५ ने वाढून ती ४२ हजार ६७० इतकी झाली असून १३९५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या १२ हजार २९६ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ५२१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ४३ वर जाऊन पोहचली आहे तर चौघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे, मालेगाव हि कोरोनाची नवी उगमस्थाने ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३ मे पर्यंत सरकारने वाढविली होती.आता सरकारने तांबड्या विभागातील दुकाने वगळता अन्य दोन ठिकाणची दुकाने उघडण्यास अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे.तथापि कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नगर जिल्ह्यात पाथर्डीस आणखी एक रुग्ण कोरोना लागण झालेला आढळल्याने सावधानता पाळत सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकाराच्या अधीन राहून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगर जिल्ह्यात पूर्ववत स्थिती ठेवण्याचा निर्णय काल उशिरा घेतला आहे.याबाबत नागरिकांना पुरेशी माहिती नसल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरु झाली होती.त्यामुळे नागरिकांत पसरलेला संभ्रम दूर करण्यासाठी व्यापारी महासंघाचे कार्यकर्ते तहसीलदार यांना भेटण्यास गेले असता कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी या बाबत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश अवगत केला.व अत्यावश्यक सेवा वगळता गर्दीची ठिकाणे असलेल्या व्यापारी पेठा,मॉल्स,व्यापारी संकुले बंदच ठेवण्यात येणार असल्याचा खुलासा केला आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,महासचिव सुधीर डागा आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close