जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोरोनामुळें कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान-भरपाई द्या

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

संवत्सर-(शिवाजी गायकवाड)

सरकारने गत २४ मार्च पासून देशभरात टाळेबंदी लागू केल्याने देशातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.कांदा,द्राक्षे,भाजीपाला,टरबूज,खरबू,फळपिके आदींचे नुकसान होण्याबरोबरच कुक्कुट पालन,दुग्ध व्यवसायाचे मोठे नुकसान झाला आहे.याचे पंचनामे करून सरकारने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

राज्यातील सर्वात मोठे पोल्ट्री केंद्र असलेल्या नैऋत्येकडे अनेक दुष्काळी गावात कुक्कुटपालन हा व्यवसाय या शेतकऱ्यांना जगण्यास सुसह्य करतो मात्र त्यांच्या व्यवसायाची वाट लागली आहे. येथे अनेक अंडी विक्री अभावी पडून आहेत.अनेक कंत्राटी पोल्ट्री शेतकरी,लहान दुग्धउत्पादक शेतकरी यांनाही मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे कारण अनेक खासगी कंत्राटी संस्थांनी त्यांचा माल घेण्यासच नकार दिला आहे.

महाराष्ट्रात कोरोना सुरु झाला तेंव्हा सुगीचा हंगाम सुरु होता.राज्यातील अनेक लहानसहान शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाला,रब्बी पिके,शिर्डी जवळ असल्याने फुलांचे उत्पादन घेतात.मात्र प्राप्त परिस्थितीत त्यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. कोरोना विरहित परिस्थिती असती तर याच शेतक-यांनी फुलांच्या शेतीतून लाखोंनी उत्पन्न घेतले असते.राज्यात पिकांच्या लागवडीवरही टाळेबंदीचा परिणाम झाला आहे. वाहतुकीच्या अभावामुळे शेतावर मजुरी करून उदरनिर्वाह करणा-या कामगारांनाही हातावर हात टाकून बसावे लागत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (एमएनआरईजीएस) होणारी कामेही ठप्प आहेत.अंड्यांच्या किमतीही सार्वकालिक नीचांकावर आल्या आहेत. आज एका अंड्याची किंमत १ रुपया ९५ पेसे एवढी आहे.राज्यातील सर्वात मोठे पोल्ट्री केंद्र असलेल्या नैऋत्येकडे अनेक दुष्काळी गावात कुक्कुटपालन हा व्यवसाय या शेतकऱ्यांना जगण्यास सुसह्य करतो मात्र त्यांच्या व्यवसायाची वाट लागली आहे. येथे अनेक अंडी विक्री अभावी पडून आहेत.अनेक कंत्राटी पोल्ट्री शेतकरी,लहान दुग्धउत्पादक शेतकरी यांनाही मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे कारण अनेक खासगी कंत्राटी संस्थांनी त्यांचा माल घेण्यासच नकार दिला आहे.

शिर्डीत नजीकच्या गावातील तरुणांना रोजगार निर्माण होतो मात्र तीर्थ क्षेत्र बंद केल्याने त्यांना आपल्या हातात हात मारून बसून घ्यावे लागले आहे.मत्स्यपालन शेतकऱ्यांची वेगळी स्थिती नाही.माहेगाव देशमुख येथील शेतकऱ्याच्या तळ्यात अज्ञात आरोपीने विषप्रयोग करून त्यास उध्वस्त करून टाकले आहे.त्याची नोंद घ्यायला पशुसंवर्धन विभागाला सवड नाही.कोरोनाच्या कर्तव्यात त्यांना गुंतवले आहे.अशीच काहीशी अवस्थाही दुग्ध व्यवसायाची झाली आहे.भाजीपाला वाहतूक करण्यात अडचणी आहेत.त्यावर मात केली तर व्यापारी भाव पाडून टाकत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची हि दयनीय अवस्था केवळ कोरोना मुले झाल्याने सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यानी केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close