जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सर्व शेतकऱ्यांना पाणी देण्यात कसूर करू नका-सूचना

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गोदावरी डाव्या उजव्या कालव्याच्या सुरु असलेल्या आवर्तनात सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळेल व शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही असे नियोजन करावे असे नियोजन करावे अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

पाण्याचा अनधिकृत उपसा थांबविण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी कडक उपाय योजना कराव्या.सर्व पिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे.पाणी पुरवठा योजनांचे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले जातील याची काळजी घ्यावी. मंजूर करण्यात आलेल्या पाण्याच्या कोट्यात सर्व शेतकऱ्यांचे भरणे होत नसेल तर वाढीव पाणी मागणी मंजूर करून घ्यावे-आ. काळे

जलसंपदा विभागाने नुकतेच उन्हाळी आवर्तन गोदावरी कालव्यांना सोडले आहे.या अवर्तनाची आढावा घेण्यासाठी नुकतीच आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.

या बैठकीसाठी कार्यकारी अभियंता सागर शिंदे,डावा कालवा उपअभियंता सागर दिघे,उजवा कालवा उपअभियंता महेश गायकवाड उपस्थित होते.यावेळी कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी डाव्या कालव्यासाठी ४६८ दलघनफुट व उजव्या कालव्यासाठी ८६९ दलघनफुट पाणी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती दिली.यावेळी आ.काळे म्हणाले की,पाण्याचा अनधिकृत उपसा थांबविण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी कडक उपाय योजना कराव्या.सर्व पिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे.पाणी पुरवठा योजनांचे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले जातील याची काळजी घ्यावी. मंजूर करण्यात आलेल्या पाण्याच्या कोट्यात सर्व शेतकऱ्यांचे भरणे होत नसेल तर वाढीव पाणी मागणी मंजूर करून घ्यावे व जोपर्यंत शेवटच्या लाभार्थी शेतकऱ्यांचे भरणे होणार नाही तोपर्यंत वितरिका बंद करू नये अशा सक्त सूचना त्यांनी या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close