कोपरगाव तालुका
संवत्सरमधील पिके उध्वस्त,जलसंपदाचा गलथान कारभार

संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असताना दुसरीकडे जलसंपदा विभागाने गोदावरी कालव्यांना पाणी सोडले मात्र कालव्यालगतची शेतकऱ्यांची वीज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करून टाकल्याने उन्हाळी पिके उध्वस्त झाली आहे.त्यातच संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील लिप्ट नं.२ चे रोहित्र जळाल्याने या सुलतानी संकटाने शेतकरी हैराण झाला आहे.या कडे कोणी राजकीय नेता लक्ष देणार का असा सवाल येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
गोदावरी कालव्यांना जलसंपदा विभागाने पाणी सोडले मात्र कालव्यानजीकची रोहित्रे बंद ठेऊन कशीबशी वाचवलेली उन्हाळी पिके डोळ्यादेखत जळताना दिसत आहे.अन्यत्र वीज सोडली जाते ती रात्री त्यामुळे जंगली जनावरांचे भय शेतकऱ्याची पाठ सोडत नाही.संवत्सर ग्रामपंचायत परिसरात तर ऐन वेळी शेताला पाणी देण्याच्या वेळीच महावितरण विभागाच्या रोहित्राने दगा दिल्याने शेतकऱ्यांना हात चोळत बसल्याचा अनास्था प्रसंग ओढवला आहे.
राज्यात सध्या कोरोना या विषाणूमुळे कहर निर्माण झाला आहे.हे चीनचे सुलतानी संकट दूर करणे यासाठी सारी सरकारी यंत्रणा ज्यातून काम करत आहे.ते काम महत्वाचेही आहे.त्या बाबत दुमत असण्याचे कारण नाही मात्र दुसरीकडे कृषी क्षेत्राचा पार बोऱ्या उडाला आहे.टाळेबंदीमुळे व्यापारी शेतकऱ्यांना लुटत आहे.तर दुसरीकडे सगळ्याच रब्बी पिके,भाजीपाला,फळपिके,फुलशेती उध्वस्त झाली आहे.शेतमाल मजूर उपलब्ध नाही शेतकऱ्यानी शेतमाल पिकवला शहरापर्यंत नेण्यासाठी वहातुक व्यवस्था नाही.आहे तो शेतमाल अवकाळी पावसापासून वाचविण्यासाठी प्लॅस्टिकची कागदाची दुकाने बंद आहेत.कुक्कुट पालन,दूध व्यवसाय मोडकळीस आला आहे.फळे व्यापारीपेठेपर्यंत नेता येत नसल्याने आहे त्या जागीच नाशिवंत बनल्याने फेकून देण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
गोदावरी कालव्यांना जलसंपदा विभागाने पाणी सोडले मात्र कालव्यानजीकची रोहित्रे बंद ठेऊन कशीबशी वाचवलेली उन्हाळी पिके डोळ्यादेखत जळताना दिसत आहे.अन्यत्र वीज सोडली जाते ती रात्री त्यामुळे जंगली जनावरांचे भय शेतकऱ्याची पाठ सोडत नाही.संवत्सर ग्रामपंचायत परिसरात तर ऐन वेळी शेताला पाणी देण्याच्या वेळीच महावितरण विभागाच्या रोहित्राने दगा दिल्याने शेतकऱ्यांना हात चोळत बसल्याचा अनास्था प्रसंग ओढवला आहे.त्यामुळे या गावाच्या हद्दीत शेतपिके जाळून जाऊ लागली आहे.जलसंपदा विभाग काही भागात वीज सोडण्यास सांगत आहे तर काही भागात सापत्न पणाची वागणूक देत आहे.याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.