जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या प्रभागात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील समता चॅरिटेबल ट्रस्ट व साई निवारा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ककोपरगाव नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता तर केलीच पण जंतुनाशक फवारण्याही केल्या.लक्ष्मीनगरात एक रुग्ण आढळल्यावर अनेकांची धांदल उडाली होती मात्र तालुका व शहर प्रशासनाने व पोलीस प्रशासने त्यावर लवकरच नियंत्रण मिळवले आहे.आज कोपरगावात नवीन रुग्ण नाही हि पालिकेच्या आरोग्य विभाग व स्वच्छता विभागाची कमाल आहे.या पार्श्वभूमीवर हा सत्कार प्रभाग क्रमांक २ मध्ये आयोजित करण्यात आला होता.

वर्तमानात कोरोना विषाणूने जागतिक पातळीवर कहर उडवून दिला आहे.जगात सुमारे दीड लाख नागरिकांचा बळी या साथीने गेला आहे.मात्र देशात या बाबत टाळेबंदीच्या काळात समाधान कारक काम झाल्याचे दिसत आहे.भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ४२७ ने वाढून ती १८ हजार ९७० इतकी झाली असून ६०१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ४ हजार ६६६ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २३२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २९ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही राज्यात हिसंख्या सर्वाधिक असली तरी कोपरगाव शहरात एक बळी गेला आहे.मात्र बाकी नागरिक मात्र सुरक्षित असल्याचे दिसत आहे.त्यामध्ये अर्थातच आरोग्य व स्वच्छता विभागाचे मोठे योगदान आहे हि बाब कोणालाही नाकारता येणार नाही.कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता तर केलीच पण जंतुनाशक फवारण्याही केल्या.लक्ष्मीनगरात एक रुग्ण आढळल्यावर अनेकांची धांदल उडाली होती मात्र तालुका व शहर प्रशासनाने व पोलीस प्रशासने त्यावर लवकरच नियंत्रण मिळवले आहे.आज कोपरगावात नवीन रुग्ण नाही हि पालिकेच्या आरोग्य विभाग व स्वच्छता विभागाची कमाल आहे.या पार्श्वभूमीवर हा सत्कार प्रभाग क्रमांक २ मध्ये आयोजित करण्यात आला होता.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे,नगरसेवक जनार्दन कदम,दीपा गिरमे,वैभव गिरमे,अमोल राजूरकर,विष्णू गायकवाड,प्रताप जोशी,हेमंत वैरागळ,विवेक जोशी, दशरथ सारवाण,वसंत डुकरे,संतोष बैरागी आदी नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close