शैक्षणिक
सोमैय्या महाविद्यालयात मायक्रो फेस्ट कार्यक्रम संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून के.जे.सोमैया महाविद्यालयामध्ये नुकतेच मायक्रो बायोलॉजी विभागाने मुलांसाठी “मायक्रो फेस्ट २०२१” या उपक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन केले होते.
कोपरगावातील के.जे.सोमैय्या महाविद्यालयात विज्ञान दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील लाइफ सायन्स विभागाने प्रा.जी.पी.कुकरेजा यांचे रिसेन्ट ट्रेण्ड्स इन लाइफ सायन्स रिसर्च या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
यामध्ये विभागातील मुलांनी वेगवेगळे विज्ञान मॉडेल्स तयार केले होते व त्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. एस.यादव यांनीआमच्या प्रतिनिधीस दिली आहे.सदर मायक्रो फेस्ट कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून न्यू आर्ट्स,कॉमर्स व सायन्स महाविद्यालय,अहमदनगर येथील मायक्रोबायोलॉजी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.जी.पी.कुकरेजा हे उपस्थित होते.सदर विज्ञान दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील लाइफ सायन्स विभागाने प्रा.जी.पी.कुकरेजा यांचे रिसेन्ट ट्रेण्ड्स इन लाइफ सायन्स रिसर्च या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.आकाश पवार, प्रा.योगेश चौधरी,प्रा.पूजा गख्खड,प्रा. प्रगती शेटे,प्रा. वृषाली आहेर, प्रा.प्रियंका शिरसाठ,अमोल दहे यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच सदर कार्यक्रमासाठी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बी.बी. भोसले,रसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस.बी.काळे,प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.डी.गवळी,वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बी.एस.गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.