शैक्षणिक
पोहेगाव विद्यालयाच्या शालांत परीक्षेचा निकाल जाहीर
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याचा शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री ग.र.औताडे माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल ९२.९९ टक्के लागला आहे.या निकालाचे सल्लागार समितीचे पदाधिकारी या पालकांनी अभिनंदन केले आहे.
शालांत परिसक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांत वाघ धीरज अनिल याने ९१.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर वाके सौरभ संजय याने ९०.४० टक्के गुण मिळवून द्वितीय स्थान प्राप्त केले आहे.तर औताडे दीपराज राजेंद्र याने ८९.८० तर पाचोरे अजय बाबासाहेब ८९.८० टक्के समान गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
शालांत परिसक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांत वाघ धीरज अनिल याने ९१.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर वाके सौरभ संजय याने ९०.४० टक्के गुण मिळवून द्वितीय स्थान प्राप्त केले आहे.तर औताडे दीपराज राजेंद्र याने ८९.८० तर पाचोरे अजय बाबासाहेब ८९.८० टक्के समान गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.विद्यालयाचा शेकडा निकाल ९२.९९ % लागला आहे.परीक्षेस १५७ विद्यार्थी बसले होते त्यात १४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.त्यात विशेष श्रेणीत ६० विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत ५३ तर द्वितीय श्रेणीत २६ तर उत्तीर्ण श्रेणीत ०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.विद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य उत्तमराव औताडे,एम.टी. रोहमारे,स्कूल कमिटी सदस्य दिलीप औताडे,विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.जी.गमे,पर्यवेक्षक बी.ए. बांगर विद्यालयाचे शिक्षक यांच्यासह पालकांनी अभिनंदन केले आहे.