जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय व्याख्यान संपन्न!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयात ग्लोबल नगरी फाऊंडेशनच्या ‘मेंटॉर मित्र -पाथ वे टू सक्सेस’ उपक्रमांतर्गत ‘आर्ट ऑफ इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग’ या विषयावर आंतरराष्ट्रीय व्याख्यान नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.विजय ठाणगे होते.

“ग्लोबल नगरी फाऊंडेशनच्या माध्यमातून परदेशात स्थायिक मराठी बांधव आपल्या विद्यार्थ्यांसाठी समाजाभिमुख व अद्ययावत ज्ञान वाटत आहेत,ही कौतुकास्पद बाब आहे”- डॉ.रोहित काळे,ग्लोबल नगरी फॉउंडेशन.

    सदर व्याख्यानासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रा.सदाशिव नागरे,प्रा.सुरेश देवरे,प्रा.गुडघे,प्रा.पडघलमल,प्रा.जगधणे व बहुसंख्य विद्यार्थी  साकरबेन हॉलमध्ये व ऑनलाईन माध्यमातून मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  सदर व्याख्यान ग्लोबल नगरी फाऊंडेशन आणि महाविद्यालयाच्या मेंटोरिंग सेलच्या वतीने करण्यात आले होते.या मार्गदर्शन सत्रासाठी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील सिमेन्स याबहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या आणि मुळच्या श्रीरामपूरच्या असलेल्या निलिमा चंद्रात्रे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.त्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये बी.ई.असून त्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट क्षेत्रात त्यांना प्रदीर्घ अनुभव असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   या व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी निर्णय प्रक्रियेचा मंत्र दिला असून एखादा चांगला निर्णय म्हणजे अत्यंत सुस्पष्ट,बहुविध माहितीवर आधारित,अनेक पर्यायांची तुलना केलेला, तडजोडीचे भान ठेवणारा आणि गरज पडल्यास बदलता येण्याजोगा असावा,असे त्यांनी सांगितले.तसेच निर्णय घेताना टाळावयाच्या सामान्य चुकांबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.अनेक वेळा चुकीच्या निर्णयामुळे वेळ,पैसा आणि आत्मविश्वासाचा ऱ्हास होतो,त्यामुळे ध्येयाने झपाटून जाऊन नवीन सवयी आत्मसात करणे गरजेचे आहे,असेही त्या म्हणाल्या.

  या व्याख्यानासाठी ग्लोबल नगरी फाऊंडेशनचे महाविद्यालयीन समन्वयक महेश कुहीले उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मेंटोरिंग सेलचे समन्वयक प्रा.डॉ.वसुदेव साळुंके यांनी केले तर आभार सह-समन्वयक प्रा.डॉ. संजय अरगडे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close