जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

अंजनापूर नदी जोड प्रकल्पाचे काय झाले ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    कोपरगाव मतदार संघाच्या जिरायती गावांना कायमचे आणि निळवंडेचे हक्काचे पाणी देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असून रांजणगाव देशमुख यथील मंगलमूर्ती लॉन्स या ठिकाणी डी. वाय.-४ चारीच्या पाईप लाईनवर व्हॉल्व्ह बसवण्याचे काम पूर्ण झाले असून धोंडेवाडी,जवळके,बहादाराबाद आणि शहापूर या गावांना निळवंडेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचा चमत्कारिक दावा आगामी पंचायत समितीसाठी इच्छुक असणाऱ्या आ.काळे गटाच्या विळ्याभोपळ्यांनी केला आहे.मात्र अंजनापूर नदी ते मंगलमूर्ती मंगल कार्यालय या नदी जोड प्रकल्पाचे तीन वर्षात काय झाले याबाबत त्यांनी आधी उत्तर द्यावे असे आवाहन निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते भाऊसाहेब गव्हाणे यांनी केले आहे.

  रांजणगाव देशमुख येथील महावितरणच्या उपकेंद्राजवळ असलेला व्हॉल्व सुरू करावा व जवळके,धोंडेवाडी,बहादाबाद,शहापूर आदी गावांना पूर पाणी द्यावे याची मागणी करताना कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,बहादरपूर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते साहेबराव रहाणे दिसत आहे.
 

“निळवंडेची वितरण व्यवस्था मंजूर करण्यासाठी कालवा कृती समितीने नाशिक येथील सी.डी.ओ.मेरी कडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.त्याचे कागदपत्रे उपलब्ध असून चिकित्सक ते पाहू शकतात.वितरण व्यवस्थेचे काम सुरू झाल्यानंतर डी.वाय.चार वर रांजणगाव देशमुख येथील महावितरण कंपनीच्या जवळ कोपरगाव संगमनेर रस्त्यालगत एक व्हॉल्व करण्यासाठी प्रयत्न सुरू होता.दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजी कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांची भेट घेतली होती.या शिवाय तळेगाव दिघे शिवारात डी.वाय.04 वर खोकडमाळ येथून पुढे बहादरपूर शिवाराच्या पश्चिम बाजूस आणि सायाळे (तालुका सिन्नर) साठी डिझाइन मंजूर करण्यासाठी कालवा कृती समितीने सातत्याने प्रयत्न केला आहे”-भाऊसाहेब गव्हाणे,कार्यकर्ते,निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक.

     उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील दुष्काळी 182 गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे काम निळवंडे कालवा कृती समितीचे रस्त्यावरील संघर्ष करून व उच्च व सर्वोच्च न्यायालयात जाऊन 31 में 2023 रोजी निळवंडे कालव्यांना पाणी सोडण्यास शासनास भाग पाडले होते.शिवाय सरकारचे निळवंडे प्रकल्पाचे आर्थिक अधिकारी गोठवले होते.एवढेच नाही तर अकोले तालुक्यातील 0 ते 28 किमी मधील काम सुरू करण्यासाठी सव्वा दोनशे पोलिस बळाचा वापर करण्याचे आदेश देऊन ते  काम कालवा कृती समितीने मार्गी लागले होते.त्यासाठी अकोले तालुक्यातील कालव्यांच्या कामाला आडवे येणाऱ्या राजकीय नेत्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.मात्र त्यावेळी बिळात जाऊन लपणारे आज निळवंडे प्रकल्पाचे श्रेय लाटण्यासाठी बिळाच्या बाहेर येऊन डराव-डराव करत असल्याचे दिसून येत आहे.आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आणि आपल्या खुशमस्करी नेत्यांना खुश करण्याचे काम करताना दिसून दिसून येत आहे.खोटी जलपूजन करण्यासाठी जाणाऱ्यांना लोकांनी कसे दगड गोटे घेऊन पिटाळले आहे.या बातम्यांची शाई अद्याप वाळली नसताना काही बांडगुळे पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसून येत आहे.त्याचा निळवंडे कालवा कृती समितीचे निषेध व्यक्त केला आहे.

निळवंडे लाभक्षेत्रातील दुष्काळी 182 गावांना पिण्याचे पाणी आरक्षित व्हावे यासाठी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची भेट घेताना कालवा कृती समितीचे पदाधिकारी दिसत आहे.

“सर्वात आधी जवळके,धोंडेवाडी,बहादराबाद,शहापूर,अंजनापूर पूर्व भाग हा निळवंडे धरणाच्या पूर पाण्यापासून वंचित राहत आहे ही बाब निळवंडे कालवा कृती समितीचे उघडकीस आणली होती.व त्यासाठी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना मे 2023 मध्ये घटनास्थळी नेऊन हे पाणी,’हॉटेल मनोदिप’ जवळ कसे आणता येईल याची माहिती अधिकाऱ्यांना घेऊन दिली होती.त्याचे जवळपास 04 -06 कोटींचे अंदाजपत्रक बनवले होते.त्यानंतर काहींनी सदर कामाचे श्रेय पळविण्यासाठी अंजनापूर शिवारातून ईशान्येस असलेल्या मंगलमूर्ती मंगल कार्यालयाजवळ हे पाणी सोडून देण्याची संकल्पना पुढे आणली होती.यात नमनाला घडाभर तेल वाया घालवले होते.त्यानंतर तीन वर्षांचा कालखंड यात बरबाद केला आहे याला जबाबदार कोण याचे उत्तर श्रेय करणाऱ्यांनी द्यावे”- साहेबराव रहाणे,ज्येष्ठ कार्यकर्ते,निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक.

    दरम्यान सर्वात आधी जवळके,धोंडेवाडी,बहादराबाद,शहापूर,अंजनापूर पूर्व भाग हा निळवंडे धरणाच्या पूर पाण्यापासून वंचित राहत आहे ही बाब निळवंडे कालवा कृती समितीचे उघडकीस आणली होती.व त्यासाठी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना मे 2034 मध्ये घटनास्थळी नेऊन हे पाणी,’हॉटेल मनोदिप’ जवळ कसे आणता येईल याची माहिती अधिकाऱ्यांना घेऊन दिली होती.त्याचे जवळपास 04 -06 कोटींचे अंदाजपत्रक बनवले होते.त्यानंतर काहींनी सदर कामाचे श्रेय पळविण्यासाठी अंजनापूर शिवारातून ईशान्येस असलेल्या मंगलमूर्ती मंगल कार्यालयाजवळ हे पाणी सोडून देण्याची संकल्पना पुढे आणली होती.यात नमनाला घडाभर तेल वाया घालवले होते.त्यानंतर तीन वर्षांचा कालखंड यात बरबाद केला होता.उजनीचे गाजर दाखवून शेतकऱ्यांना पुरेसे पाणी दिले तर नाहीच पण तीन वर्षे ही गावे निळवंडेच्या पूर पाण्यापासून वंचित ठेवली असल्याचे दिसून आले आहे.

तळेगाव दिघे शिवारात डी.वाय.04 वर खोकडमाळ येथून पुढे बहादरपूर शिवाराच्या पश्चिम बाजूस आणि सायाळे (तालुका सिन्नर) साठी डिझाइन मंजूर करण्यासाठी कालवा कृती समितीने सातत्याने प्रयत्न केला आहे.सुरू झालेल्या कामाची पाहणी करताना समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,बाळासाहेब सोनवणे आदी दिसत आहे.

  दरम्यान वितरण व्यवस्था मंजूर करण्यासाठी कालवा कृती समितीने नाशिक येथील सी.डी.ओ.मेरी कडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.त्याचे कागदपत्रे उपलब्ध असून चिकित्सक ते पाहू शकतात.वितरण व्यवस्थेचे काम सुरू झाल्यानंतर डी.वाय.चार वर रांजणगाव देशमुख येथील महावितरण कंपनीच्या जवळ कोपरगाव संगमनेर रस्त्यालगत एक व्हॉल्व करण्यासाठी प्रयत्न सुरू होता.दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांची भेट घेतली होती.या शिवाय तळेगाव दिघे शिवारात डी.वाय.04 वर खोकडमाळ येथून पुढे बहादरपूर शिवाराच्या पश्चिम बाजूस आणि सायाळे ( तालुका सिन्नर) साठी डिझाइन मंजूर करण्यासाठी कालवा कृती समितीने सातत्याने प्रयत्न केला आहे.त्यानंतर चिंचोली शिवारातील तीनशे हेक्टर क्षेत्र वगळले होते.त्यांना पाणी देण्यासाठी कृती समितीने सातत्याने पाठपुरावा केला आहे.त्यालाही जलपसंपदा विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे.आणि ती तिन्ही कामे सुरू झाली आहे.मात्र आज निवडणुका पाहून काही हौसे -गवशे मंडळी समितीचे श्रेय घेण्यासाठी सरसावली आहे.ज्यांनी निळवंडे धरणाच्या कालव्यांचे आंदोलनावर कायम टीका केली आहे.आणि दुस्वास केला आहे त्यांना आज निळवंडेची उबळ येत आहे हे मोठे आश्चर्य असल्याचे मानले जात आहे.त्यांचे नेते या कार्यकर्त्यांना एवढे परम प्रतापी वाटत असतील तर त्यांनी दुष्काळी 182 गावांचे पाणी आरक्षित करून दाखवावे असे आवाहन करून असे आवाहन केले आहे.या कामाचे श्रेय लाटण्याआधी श्रेयवाद करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कोणाचे बाहुले बनण्याआधी एकदा स्वतःच्या अंतःकरणात डोकावून पहावे असे आवाहन शेवटी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते भाऊसाहेब गव्हाणे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close