शैक्षणिक
‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी’ उपक्रम संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित पुणे ते पंढरपूर आषाढी वारीनिमित्त ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’ या उपक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.

महाराष्ट्राची पंढरपूर वारी हा जगातील सर्वात मोठ्या मानवी समूहांच्या संमेलनांपैकी एक आहे.लाखो वारकरी या वारीत सहभागी होतात.एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येत असल्याने स्वच्छता आणि आरोग्य या गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक बनले आहे.वारीच्या काळात दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे कॉलरा,गॅस्ट्रो,काविळी यांसारखे आजार पसरण्याचा धोका असतो.’स्वस्थ वारी’ अंतर्गत ठिकठिकाणी मोफत औषधोपचार, रुग्णवाहिका आणि आरोग्य शिबिरे वारकऱ्यांना थकवा व आजारपणातून त्वरित आराम देतात.वारीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि कचरा जमा होतो.त्यामुळे या ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी’ या उपक्रमांचे विशेष महत्व मानले जात आहे.त्यात के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे.
‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी’ हा केवळ एक शासकीय किंवा सामाजिक उपक्रम नसून ती काळाची गरज आहे.महाराष्ट्राची पंढरपूर वारी हा जगातील सर्वात मोठ्या मानवी समूहांच्या संमेलनांपैकी एक आहे.लाखो वारकरी या वारीत सहभागी होतात.एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येत असल्याने स्वच्छता आणि आरोग्य या गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक बनले आहे.वारीच्या काळात दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे कॉलरा,गॅस्ट्रो,काविळी यांसारखे आजार पसरण्याचा धोका असतो.’स्वस्थ वारी’ अंतर्गत ठिकठिकाणी मोफत औषधोपचार, रुग्णवाहिका आणि आरोग्य शिबिरे वारकऱ्यांना थकवा व आजारपणातून त्वरित आराम देतात.वारीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि कचरा जमा होतो.स्वच्छ वारी उपक्रम हा कचरा वेळेवर उचलण्यास आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्यास मदत करतो.या शिवाय चंद्रभागा आणि वारीच्या मार्गावरील इतर नद्यांचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी हा उपक्रम कचरा नदीपात्रात टाकण्यापासून रोखतो.त्यामुळे अलीकडील काळात या वारीचे महत्व वाढले आहे.त्यात यावेळी कोपरगाव येथील के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयाने महत्वाची भूमिका निभावली आहे.
त्यात त्यांनी दि.९ ते २५ जुलै २०२६ या कालावधीत संपन्न झालेल्या या दिंडीमध्ये कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक सौरव बाबासाहेब जाधव व सार्थक राजु दवंगे यांनी विद्यापीठाच्या वतीने पालखीसोबत सहभागी होऊन आपला सक्रिय सहभाग नोंदविला आहे.राज्यस्तरीय ‘सक्षम महिला,समृद्ध महाराष्ट्र दिंडी’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात या दोनही स्वयंसेवकांनी विद्यार्थी ग्रुपचे नेतृत्व करताना या कालावधीत दिंडीत सहभागी वारकरांची सेवा,भक्तांचे आरोग्य,त्यांच्या मुक्कामी राहण्याची व्यवस्था व तेथील परिसर स्वच्छतेचे काम केले.या सेवेतून सामाजिक बांधिलकी जपत या स्वयंसेवकांनी कडेपठार येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.पालखी सोहळ्यात माऊलीच्या जयघोषाबरोबरच अभंग,भक्तिगीते व भारूड सादरीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान सौरव जाधव व सार्थक दवंगे यांनी या सामाजिक उपक्रमांत घेतलेल्या सहभागाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांच्या हस्ते या दोनही स्वयंसेवकांना सन्मानित करण्यात आले आहे.
याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एस.गायकवाड,प्रा.डॉ.संजय दवंगे,कार्यालयीन अधिक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.या वारीमध्ये सर्वच स्वयंसेवकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ.गणेश भामे,जिल्हा समन्वयक डॉ.गणेश निमसे,डॉ.सुनील मोहटे, डॉ.प्रताप फलफले,दिनेश जाधव,निलेश कडू,ऋषिकेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले आहे.



