जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात,’आपले सेवा केंद्र ‘ मंजूर !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे महाविद्यालयात राज्य सरकारतर्फे आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यात आले असून त्याचे उद्घाटन नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा.नारायण बारे यांचे हस्ते करण्यात आले आहे.

  

   या सेवा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया व शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक दाखल्यांसोबतच स्पर्धा परीक्षांचे अर्ज दाखल करता येणार असून नागरीकांना आधारकार्ड,रेशनकार्ड,पॅनकार्ड आणि शेतकरी बांधवांसाठी असणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचे लाभही सहजरित्या मिळवता येणार आहेत.

   आपले सरकार सेवा केंद्र (महा ई-सेवा केंद्र) मंजूर करण्याची आणि सुरू करण्याची गरज नागरıकांना सर्व शासकीय योजना व कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देण्यासाठी आहे.यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचतो आणि शासकीय कामांमध्ये पारदर्शकता येते.त्यामुळे जनतेची गरज पूर्ण होते व त्यांचा वेळ आणि पैशाची बचत होते.लोकांना कागदपत्रे काढण्यासाठी दूरच्या सरकारी कार्यालयांत जावे लागत नाही.त्यांना आवश्यक दाखले,प्रमाणपत्रे आणि अर्ज एकाच ठिकाणाहून मिळतात.परिणामी भ्रष्टाचाराला आळा बसतो व थेट डिजिटल सेवा मिळते.ही गरज ओळखून महाविद्यालय प्रशासनाने संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाकडे सेतू केंद्र मंजुरीचा प्रस्ताव सादर केला होता.या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.त्यामुळे महाविद्यालयाचे विद्यार्थी व महविद्यालय परिसरातील अनेक शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना सर्व शासकीय दाखले आणि ऑनलाईन सुविधा आता सुशीलामाई काळे महाविद्यालयात उपलब्ध होणार आहे.

   या सेवा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया व शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक दाखल्यांसोबतच स्पर्धा परीक्षांचे अर्ज दाखल करता येणार असून नागरीकांना आधारकार्ड,रेशनकार्ड,पॅनकार्ड आणि शेतकरी बांधवांसाठी असणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचे लाभही सहजरित्या मिळवता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी,पालक आणि नागरिकांच्या वेळेची आणि पैशांची मोठी बचत होणार आहे.संस्थेच्या महाविद्यालयात सेवा  केंद्र सुरू झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना कोणत्याही शासकीय दाखल्यासाठी किंवा ऑनलाईन कामासाठी खाजगी केंद्रांवर अवलंबून राहावे लागणार नाही.विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वेळेतच या सेतू केंद्र सुविधेचा लाभ घेता येणार असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा शासकीय दाखला काढण्यासाठी विद्यार्थ्यांना द्यावा लागणारा वेळ वाचणार आहे.परिसरातील सर्व नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या शासकीय सेवा केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी संस्थेचे निरीक्षक नारायण बारे यांनी केले आहे.

   याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.विजया गुरसळ,गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचे प्राचार्य वसीम शेख आदींसह सुशीलामाई काळे महाविद्यालयाचे प्राध्यापक,प्राध्यापिका उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close