शैक्षणिक
मुख्याध्यापक दरेकर सेवानिवृत!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेत प्राथमिक शाळेत सुभाष दरेकर यांनी अनेक पिढ्या घडवली असून यांनी आपल्या सेवने अनेक विद्यार्थ्यांना संस्कारित केले असून त्या पिढ्या त्यांच्या ऋणात राहतील असे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

मावळते मुख्याध्यापक सुभाष दरेकर यांनी आपल्या सेवेची सुरुवात गौतमनगर येथून करून त्यानंतर आपले कर्तव्य बीड येथील कणकालेश्वर,विंचूर,श्रीरामपूर आणि शेवट कोपरगाव येथील डॉ.पद्मा मेहता प्राथमिक विद्यालयात सेवेची 37 वर्षांची सायंकाळ यशस्वीपणे घालवली असल्याचे सांगितले आहे.त्यांच्या सेवेबद्दल अनेकांनी कौतुक करून उर्वरित आयुष्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी-जवळके येथील रहिवासी व रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले सुभाष मच्छिंद्र (एस.एम.) दरेकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सत्कार आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते व कोपरगाव बेट येथील महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे त्यावेळी ते बोलत होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे हे होते.

सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे,युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,बाळासाहेब नरोडे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी गटनेते वीरेन बोरावके,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,रयत शिक्षण संस्थेचे सदस्य श्री.सोनवणे,राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रशांत वाबळे,भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास रहाणे,युवा आघाडीचे विक्रम पाचोरे,माजी सरपंच माणिक दिघे,बाबुराव थोरात,शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र थोरात,बंडु थोरात आदीसह बहुसंख्य नागरिक आणि हितचिंतक उपस्थित होते.
सदर प्रसंगी प्रास्ताविक शुभांगी शेळके यांनी केले तर महंत रमेशगिरीजी महाराज,संदीप वर्पे,पत्रकार नानासाहेब जवरे,कैलास रहाणे,विक्रम पाचोरे आदींनी सुभाष दरेकर यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे.तर सूत्रसंचालन कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले आहे तर शेवटी उपस्थितांचे आभार प्रदीप दरेकर यांनी मानले आहे.
दरम्यान मुख्याध्यापक सुभाष दरेकर यांनी आपल्या सेवेची सुरुवात 1989 साली गौतमनगर येथील छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयातून करून त्या ठिकाणी 16 वर्षे सेवा बजावली होती.तर त्यानंतर त्यानी बीड येथे कणकालेश्वर येथील विद्यालयात अल्पकाळ आपली सेवा संपर्पित केली होती.त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा छत्रपती संभाजी विद्यालयात पुन्हा एकदा 2006 पासून ते 2013 पर्यंत सात वर्षे आपले कर्तव्य बजावले होते.त्यानंतर त्यांनी सन 2013-14 मध्ये विंचूर या ठिकाणी एक वर्षे काम करून पुन्हा नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या ठिकाणी पदार्पण करून एस.के.सोमैया प्राथमिक विद्यालयात दोन वर्षे आपल्या सेवेची चुणूक दाखवली होती.त्यानंतर सन -2026 साली पुन्हा एका कोपरगाव येथील डॉ.पद्मा मेहता विद्यालयात 2016 ते 2026 दहा वर्षे आपल्या सेवेची सायंकाळ घालविली होती.त्यांच्या सेवने अनेकांची मने जिंकून घेतली होती.त्यामुळे त्यांचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याचे मानलं जात आहे.त्यावेळी मुख्याध्यापक दरेकर यांनी आपण दुष्काळी असलेल्या गावात प्रतिकूल काळात शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला असल्याचे सांगून आपल्या या सेवेबाबत आपल्या आई-वडिलांचे ऋण व्यक्त केले आहे.


