शैक्षणिक
…या रुग्णालयासाठी आर.जे.एस.महाविद्यालयाचे विद्यार्थी पात्र

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलच्या जेष्ठ व्यवस्थापक मृणाल उजागरे आदींनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग महाविद्यालयाच्या बी.एस्सी.उत्तीर्ण विद्यार्थिनीच्या नुकत्याच मुलाखती घेतल्या होत्या त्यात नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी नुकत्याच यशस्वी झाल्या असल्याची माहिती हाती आली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील २६ ऑगस्ट रोजी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशन नर्सिंग कॉलेजच्या बी.एस्सी.नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाच्या ३६ विद्यार्थ्यांची पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलच्या जेष्ठ व्यवस्थापक मृणाल उजागरे,उप-अधीक्षक मोहम्मद सदामुद्दीन,सहाय्यक अधीक्षक विन्नारसी सेलवम,शिक्षक परिचारिका श्रद्धा दळवी,या अधिकाऱ्यांनी आर.जे.एस.नर्सिंग महाविद्यालयात मुलाखत घेतली होती.दि.२ सप्टेंबर शनिवार रोजी रुबी हॉल हॉस्पिटल पुणे यांच्या अधिकृत ईमेलद्वारे ३६ पैकी ३६ विद्यार्थ्यांची निवड केल्याचे कळवले आहे.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना सन-२०१९ रोजी झाली असून तेथे विद्यार्थ्यांना पुण्या-मुंबईतील दर्जाचे शिक्षण मिळत असल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहे.या महाविद्यालयात बी.एस्सी.नर्सिंग,जी.एन.एम.नर्सिंग,ए.एन.एम.नर्सिंग,पोस्ट बेसिक बी.एस्सी नर्सिंग हे महत्वपूर्ण पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,सचिव प्रसाद कातकडे,डॉ.पूजा कातकडे,विजय कडू,दिपक कोटमे आदींच्या वतीने नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.इरशाद अली,उप-प्राचार्य डॉ.सुरेश जिल्स व सर्व शिक्षक आदिनीं अभिनंदन केले आहे.