निधन वार्ता
रमेश सब्बन याचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य सरचिटणीस अशोक सब्बन व सब्बन अॅटोमोबाईलचे चालक शिरीष सब्बन याचे वडील रमेश नरसय्या सब्बन (वय-९५) यांचे नुकतेच आज दुपारी अल्प आजाराने शुक्रवार दि.११ नोव्हेबर रोजी दु.१२.३० वा. दुखःद निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
स्व.रमेश नरसय्या सब्बन हे कृषी विभागाचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी,पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक व माजी उपाध्यक्ष होते.त्यांनी कृषी विभागात प्रदीर्घ सेवा केली होती.ते अत्यंत प्रामाणिक व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात.सामाजिक कार्यात ते हिरहिरीने सहभागी होत असत.ते शेवट पर्यत शैक्षणिक कार्यात सहभागी होत होते.
ते नवनाथ पंथी चैतन्य देवेंद्रनाथ याचे आवडते शिष्य होते.नवनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव पदही त्यांनी सांभाळले होते.सैध्दांतीक जीवन शैली मुळे अनेक क्षेत्रात त्यांचा मोठा मित्र परीवार होता.त्यांच्या पश्चात भाऊ,दोन मुले,दोन मुली,सुना,पुतण्या,पुतण्या,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनाबद्दल भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनाचे नेते अण्णा हजारे,सोमनाथ दरंदले,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे आदींनी शोक व्यक्त केला आहे.