निधन वार्ता
रावसाहेब गोर्डे यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील रहिवासी व प्रगतशील शेतकरी रावसाहेब जगन्नाथ गोर्डे यांचे नुकतेच अकाली निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी मुलगा,मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर रांजणगाव देशमुख येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले आहे.
स्व.रावसाहेब गोर्डे हे मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते.त्यांना उपचारार्थ घोटी येथे भरती केले होते.मात्र त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाचविण्यात अपयश आले आहे.
त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ते रांजणगाव देशमुख येथील जेष्ठ कार्यकर्ते जगन्नाथ गोर्डे यांचे चिरंजीव होते.