निधन वार्ता
बढे गुरुजी यांना पितृशोक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे निवृत्ती बढे यांचे पिताश्री रेवजी नामदेव बढे (वय-८९) यांचे नुकतेच वृद्धापकाळामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,दोन मुली असा परिवार आहे.
स्व.रेवजी बढे हे शेगावचे गजानन महाराज यांचे निस्सीम भक्त होते,त्यांनी पन्नास वर्षांपासून प्रत्येक वर्षी शेगावची पायी वारी करत असत.
त्यांच्यावर वेस येथील अमर धाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्या त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जवळके येथील छायाचित्रकार जालिंदर बढे,व मच्छिन्द्र बढे यांचे ते पिताश्री होते.