निधन वार्ता
बाळासाहेब उगले यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर (प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व प्रगतशील शेतकरी बाळासाहेब कारभारी उगले (वय-63) यांचे सोमवारी दि.१० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.४५ वाजता निधन झाले आहे.संवत्सर येथे गोदावरी काठावरील अमरधामध्ये रात्री साडेनऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

स्व.बाळासाहेब उगले यांनी सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम केलेले असून आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी मोठा मित्र परिवार जमविला होता.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या अंत्यविधीसमयी संवत्सर पंचक्रोशीतील अनेक मित्रपरिवार,नातेवाईक,विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व.बाळासाहेब उगले यांच्या निधनाचे वृत्त कळताच गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,माजी सरपंच सुलोचना ढेपले,माजी उपसरपंच विवेक परजणे आदींनी शोक व्यक्त केला आहे.



