जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेसह मुलगी गायब,कोपरगावात तालुका पोलीस ठाण्यात नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी असलेली महिला वैशाली गणेश आल्हाटे (वय-३९) व मुलगी श्रीशा (वय-०६) या दोघी काही एक न सांगता घरातून गायब झाल्या आहेत.या प्रकरणी शोधाशोध घेऊनही त्या मिळून आल्या नाहीत त्यामुळे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार गणेश उत्तम आल्हाटे (वय-३८) यांनी दाखल केली आहे.त्यामुळे सुरेगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

“आपण सुरेगाव येथे भाजीपाला आणण्यासाठी गेलो असता तो घेऊन घरी आलो असता आपली पत्नी वैशाली आल्हाटे व मुलगी श्रीशा या आपल्याला आढळून आल्या नाहीत.घरी अन्य दोघी मुली होत्या.त्यांना विचारणा केली असता त्यांनी ती दुसरी मुलगी श्रीशास घेऊन बाहेर गेली असल्याचे सांगितले आहे.मात्र आपण सुरेगाव व अन्यत्र नातेवाईकांकडे त्यांना शोधूनही त्या सापडल्या नाहीत”-गणेश आल्हाटे,फिर्यादी सुरेगाव.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी इसम हा आपल्या कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी असून तो वहान चालक आहे.आपली पत्नी,तीन मुली असे एकत्र राहत होते.दि.२८ जुलै रोजी आपण सुरेगाव येथे भाजीपाला आणण्यासाठी गेलो असता तो घेऊन घरी आलो असता आपली पत्नी वैशाली आल्हाटे व मुलगी श्रीशा या आपल्याला आढळून आल्या नाहीत.घरी अन्य दोघी मुली होत्या.त्यांना विचारणा केली असता त्यांनी ती दुसरी मुलगी श्रीशास घेऊन बाहेर गेली असल्याचे सांगितले आहे.मात्र आपण सुरेगाव व अन्यत्र नातेवाईकांकडे त्यांना शोधूनही त्या सापडल्या नाहीत.
या प्रकरणी फिर्यादी इसम गणेश आल्हाटे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यास खबर दिली असून त्यांचा शोध घेण्याची विनंती केली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी हरविल्याच्या रजिस्टरला नोंद क्रं.३८/२०२२ दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव याचे मार्गदर्शनाखाली यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close