निधन वार्ता
प्रसिद्ध व्यापारी डागा यांना पितृशोक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रसिद्ध व्यापारी डागा यांना पितृशोक
कोपरगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी व संदीप एजन्सीजचे संचालक संदीप डागा यांचे पिताश्री शिवदास पन्नालाल डागा (वय-९०) यांचे नुकतेच वृद्धापकाळामुळे तुकाराम बीजेच्या दिवशी निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन भाऊ,पत्नी,चार मुले,नातवंडे,असा परिवार आहे.
स्व.शिवदास डागा यांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी कोपरगाव येथे उदरनिर्वाहासाठी ७० वर्षांपूर्वी आणले होते.त्या नंतर त्यांच्या आगामी पिढ्या कोपरगाव शहरातील रहिवासी झाले.त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या अपत्यांचे शिक्षण केले होते.आज ते प्रथितयश व्यापारी तर कोणी वकिली क्षेत्रात प्रस्थापित झालेले आहे.
स्व.शिवदास डागा यांचे मूळ गाव श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी भान हे होते.ते अत्यंत धार्मिक म्हणून ओळखले जात. त्यांचे आजोळ कोपरगाव शहर असल्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना कोपरगाव येथे उदरनिर्वाहासाठी ७० वर्षांपूर्वी आणले होते.त्या नंतर त्यांच्या आगामी पिढ्या कोपरगाव शहरातील रहिवासी झाले.त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या अपत्यांचे शिक्षण केले होते.आज ते प्रथितयश व्यापारी तर कोणी वकिली क्षेत्रात प्रस्थापित झालेले आहे.त्यांना कोपरगाव अमर धाम येथे त्यांचे पुत्र संदीप डागा यांनी अग्निडाग दिला होता.
अंत्यविधीसाठी कोपरगाव शहरातील पीपल्स बँकेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा,सुनील बंब व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या निधनानाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.