निधन वार्ता
कोपरगावात वाडेकर यांना मातृशोक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते व बोरावके चाळ येथील रहिवासी विनीत वाडेकर यांच्या मातोश्री वसुंधराबाई राघवेंद्र वाडेकर (वय-७२ )यांचे आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्यावर आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्या वेळी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणेंसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.वसुंधराबाई वाडेकर या अत्यन्त धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून शहरात प्रासिद्ध होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांनी अत्यन्त प्रतिकूल काळात या कुटुंबाला संभाळून नेले होते.त्यांच्या पच्छात सेवानिवृत्त सैनिक पती,दोन मुले,मुलगी आदी परिवार आहे.
सदर प्रसंगी शहर भाजपचे माजी अध्यक्ष विनायक गायकवाड,प्रभाकर वाणी,जेष्ठ नेते सुद्धाप्पा कुलकर्णी,शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंत जोशी,आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.