निधन वार्ता
अनुसयाबाई भोसले यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील गणपती तळे परिसरातील शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ गृहिणी अनुसयाबाई तुळशीराम भोसले (वय -८२वर्षे )यांचे बुधवार दि.१४ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११.४५ वाजता निधन झाले आहे.संवत्सर येथील अमरधामध्ये त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

स्व.अनुसयाबाई भोसले या धार्मिक व मनमिळावू स्वभावाने संवत्सर पंचक्रोशीत परिचित होत्या.पतीच्या निधनानंतर त्यांनी शेती व प्रपंच यशस्वीपणे सांभाळून मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले होते.गृहिणी म्हणून त्यांनी प्रपंच यशस्वी करून दाखवला.त्यांच्यामागे पांडुरंग भोसले,बाळासाहेब भोसले ही दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.कै.अनुसयाबाई भोसले यांच्या निधनाबद्दल आ.आशुतोष काळे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,माजी सरपंच सुलोचनाबाई ढेपले,माजी उपसरपंच विवेक परजणे यांनी शोक व्यक्त केला आहे.स्व.अनुसयाबाई भोसले यांच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.



