निधन वार्ता
प्रमोद रगडे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व युवक कार्यकर्ते प्रमोद सुधाकर रगडे (वय – वर्षे) यांचे मंगळवार दि.१० नोव्हेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता अल्प आजाराने निधन झाले आहे.संवत्सर येथे गोदावरी काठावरील अमरधामध्ये सकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

कै.प्रमोद रगडे यांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावाने मोठा मित्र परिवार जमविला होता.तरुण वयात त्याचे निधन झाल्याने संवत्सर परिसरात सर्वत्रच प्रामुख्याने युवक वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांचे अकाली झालेले निधन सर्वांनाच चटका लाऊन गेले असल्याचे मानले जात आहे.
कै.प्रमोद रगडे यांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावाने मोठा मित्र परिवार जमविला होता.तरुण वयात त्याचे निधन झाल्याने संवत्सर परिसरात सर्वत्रच प्रामुख्याने युवक वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांचे अकाली झालेले निधन सर्वांनाच चटका लाऊन गेले.त्यांच्यामागे आई,वडील तसेच बंधू प्रशांत रगडे,विशाल रगडे,अक्षय रगडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अंत्यविधीसमयी संवत्सर पंचक्रोशीतील अनेक मित्रपरिवार,नातेवाईक,विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनेकांनी त्यांना यावेळी श्रध्दांजली वाहिली.कै. प्रमोद रगडे यांच्या निधनाचे वृत्त कळताच माजी सरपंच सुलोचना ठेपले,माजी उपसरपंच विवेक परजणे आदींनी शोक व्यक्त केला आहे.



