जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

सचिन गोंदकर यांचे निधन!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  शिर्डी येथील प्रसिद्ध साईबाबा विश्वस्त व्यवस्थेचे माजी विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर यांचे कनिष्ठ सुपुत्र सचिन एकनाथ गोंदकर (वय -४२) यांचे आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,एक भाऊ,पत्नी,मुलगा असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.सचिन गोंदकर यांचे छायाचित्र.

  स्व.सचिन गोंदकर हे अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे म्हणून शिर्डी आणि राहाता तालुक्यात सुपरिचित होते.ते आपला हॉटेल व्यवसायासह प्रगतशील शेतकरी म्हणूनही परिचित होते.त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे.त्यांच्यावर शिर्डी येथील अमरधाम येथे रात्री ७.२० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.ते श्री.गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक शोभाताई एकनाथ गोंदकर यांचे पुत्र होते.

  सदर अंत्यविधी प्रसंगी प्रसंगी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,दक्षिण नगरचे माजी खा.डॉ,सुजय विखे,संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,राष्ट्रवादीचे सचिव अविनाश आदिक,राष्ट्रवादीचे माजी शहर प्रमुख सुधाकर शिंदे,शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते,माजी उपनगराध्यक्ष शिवाजी गोंदकर,नीलेश कोते,सचिन गुजर,गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुरेश लहारे,उपाध्यक्ष विजय दंडवते,शिर्डीचे उपनगराध्यक्ष अभय शेळके,शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते,गौतम बँकेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कोते,आदींसह मोठ्या संख्येने नागरिक,महिला,आप्तस्वकीय उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close