निधन वार्ता
गेणू थोरात यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीतील थोरात वस्ती येथील रहिवासी शेतकरी गेणू पुंजा थोरात (वय ६५ वर्षे )यांचे आज दुपारी ०२ वाजेच्या सुमारास निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,पाच भाऊ,पुतणे,दोन बहीणी असा मोठा परिवार आहे.
स्व.थोरात हे अभ्यासू व विनोदी स्वभावाचे म्हणून परिसरात परीचित होते.त्यांनी अनेक वर्ष महावितरण कंपनीचे ठेकेदार म्हणून लौकिक स्थापन केला होता.ते जवळके विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक होते.
त्यांचा अंत्यविधी सोमवार दि.१४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ०६ वाजता जवळके वैकुंठधाम येथे संपन्न झाला आहे.स्व.थोरात यांच्या निधनाने जवळके आणि परिसरात शोककळा पसरली आहे.ते गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी रसायन तज्ञ नवनाथ थोरात यांचे जेष्ठ बंधू ते माजी सरपंच बंडोपंत थोरात यांचे चुलते होते.