जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

सावळीविहिर नजीक जोडपे जेरबंद,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे
शिर्डी ( प्रतिनिधी )

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व ते प्रयत्न करीत आहे ,सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे, सर्व बंद आहे, असे असतानाही मात्र शिर्डी जवळील सावळीविहिर फाटा येथील हॉटेल वेलकम येथे आपले रंग उधळण्यासाठी आलेल्या एका जोडप्याला पोलिसांनी पकडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान या घटनेत कोपरगाव पालिकेशी संबंधित अपक्ष नगरसेवकाचा दिवटा तर पदाधिकाऱ्याशी संबंधित दिवट्याचा अप्रत्यक्ष हॉटेल्सशी संबध असल्याची नागरिकांत मोठी चर्चा शिर्डी,कोपरगाव परिसरात झडत आहे.

वर्तमान काळात देशात व राज्यात ताळेबंदी लागू असून या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.मात्र काही प्रेमी युगुल मात्र वर्तमान काळाचा व शुकशुकटाचा अनैतिक कारणासाठी वापर करताना आढळून येत आहे.हे धक्कादायक आहे.त्यामुळे काळात असे प्रकार घडत असल्याने शिर्डी व परिसरातील नागरिकांनी खेद व्यक्त केला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, शिर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डी जवळील सावळीविहीर फाटा दगडाच्या खाणींनजीक नाशिक रोडला हॉटेल वेलकम तसेच एस्सार रिसॉर्ट हॉटेल के.क.मिल्कलगत आहे.या हॉटेलमध्ये बुधवार दि.२९ रोजी दुपारी काही मुले व मुली आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली.त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अौताडे व सहाय्यक पो.नि घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलिसांचे पथक त्वरित सावळीविहीर फाटा येथील तेथे के.के. मिल्क जवळील हॉटेल वेलकम मध्ये पाठवले. या पोलीस पथकाने या हॉटेलची तेथील खोल्यांची सखोल तपासणी केली असता तेथे एका खोलीत मध्ये एक पुरुष, एक महिला आढळून आली.मोहसिन मेहमुद सय्यद ( वय २९) रा.गांधीनगर,कोपरगाव हा आपल्या दुचाकीवरून विनापरवाना कोपरगावहून सावळीविहीर फाटा येथे येऊन त्यांनी हॉटेल वेलकम येथे लॉजवर खोली घेतली होती व या खोलीमध्ये एक महिला सोबत होती. या ताळेबंदीच्या काळात सर्व हॉटेल बंद असताना हॉटेल वेलकम हॉटेल रिसॉर्टचे व्यवस्थापक रामहरी जानराव काळे (वय-२९)रा.टाकळी विरो,ता.शेगाव,जिल्हा-बुलढाणा हल्ली रा.के.के.मिल्क जवळ सावळीविहिर खुर्द ता.राहाता याने आरोपींना कोणतेही ओळखपत्र न पाहता खोली दिली तसेच त्यांची नोंद ठेवली नाही.त्याच्याकडे नोंद रजिस्टर आढळून आले नाही.त्यामुळे फिर्यादी पोलीस शिपाई अजय विजय अंधारे यांनी आरोपी व्यवस्थापक रामहरी जानराव काळे यांच्यावर तसेच मोसीन मेहमूद सय्यद यांच्यावर शिर्डी ठाण्यात भा.द.वि. कलम १८८(२) २६९, २७१ व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा,१८९७ कलम २,३,४ प्रमाणे व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-२००५ चे कलम ५१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुढील तपास शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिस करीत आहेत.सध्या केरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर ताळेबंद सुरू आहे.सर्वजण आपापल्या घरात असताना शिर्डी व परिसरातील हॉटेल बंद असताना लॉज बंद असताना तरीही आपले रंग उधळण्यासाठी करण्यासाठी काही जोडपे,तरुण मुले-मुली शिर्डी व परिसरात येऊन लॉजवर खोल्या घेवून राहतात.असे प्रकार शिर्डी, सावळीविहिर,निमगाव निघोज परिसरातही अनेक व्यावसायिक समोरून आपली लॉज किंवा दुकान बंद असल्याचे भासवून अधिकच्या अर्थलाभासाठी अनेक अनैतिक व्यवसाय करत आहेत. त्यांना येथील लॉजवाले अधिक पैशाच्या मोहापायी अधिकच्या कागदपत्रांची छाननी न करता खोल्या देत आहेत. त्या बाबत कोणतेही ओळखपत्र किंवा नोंद ठेवली जात नाही.कोणतेही नोंद ठेवण्याची दैनंदिनीही नसते.यामुळे कोरोणा विषाणूची साथ पसरण्याचा धोका वाढू शकतो.ताळेबंदीमुळे नागरिकांना पोलिसांनी घरातच कोंडून टाकले आहे.मात्र काही जण आपले आंबट शौक पूर्ण करण्यासाठी कोणताही विचार न करता पैशाचा उत्तमात करत फिरत आहे. लॉज मालक अधिकच्या हव्यासापोटी काहीही करायला तयार होतात.ही बाब धक्कादायक आहे. असे अनेक लॉज सध्या शिर्डी परिसरात आहेत.याकडे शिर्डी पोलीसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close