गुन्हे विषयक
नगर जिल्ह्यात दागिने ओरबडणारी टोळी अखेर गजाआड,दागिनेही जप्त

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयातील शिक्षिका संगीता गणेश देशमुख (वय-५४) या आपली स्कुटी पार्क करत असताना त्यांच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रूपये किमतीचे दागिने ओरबाडून पळून जाणाऱ्या टोळीचा छडा नगर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने लावला असून त्यातील प्रमुख आरोपी नागेश काळे हा श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील असून त्याच्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडील ०२ लाख ०५ हजार रुपयांचा सुमारे सहा तोळ्यांचा सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल पोलिसानी जप्त केला आहे.त्यामुळे नगर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रमुख आरोपीस त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.मात्र पोलिसांनी आपला हिसका दाखवला असता तो पोपटासारखा बोलू लागला व त्याने आपल्या घरात लपवलेले दोन सोन्याचे मिनी गंठण,दोन सोन्याचे मंगळसूत्र असे ६० ग्रॅम वजनाचे दागिने काढून दिले आहे.त्याची कसून चौकशी केली असतात यांचे साथीदार म्हणून सोंड्या उर्फ आदित्य गणेश पिंपळे,रा.अशोक कारखाना,संदीप दादाहरी काळे,रा.वडाळा महादेव, व आणखी एक आरोपी असे तिघे मिळून केल्याचे उघड झाले आहे.वरील तिघांना विविध दोन ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.चौथा आरोपी मात्र फरार झालेला आढळून आला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला या कोपरगाव शहरातील साईनगर येथील रहिवासी आहेत त्या कोपरंगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ.सी.एम.मेहता विद्यालयात शिक्षिका आहेत.त्या आपल्या घरून शाळेत कर्तव्यावर जात असताना त्या शाळेत पोहचल्या असता आपली स्कुटी हि दुचाकी आपल्या पार्किंग मध्ये लावत असताना मागून अज्ञात भामटे आले व त्यांनी या शिक्षिकेच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठन आपल्या दुचाकीच्या सहाय्याने दोन भामट्यानीं पळवून नेले होते.त्या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु,र.क्रं.२९३/२०२१ अन्वये कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस तपास करत असताना नगर येथील गुन्हे अन्वेषण विभागाला गुप्त खबर मिळाली की,सदरचा गुन्हा हा श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील आरोपी नागेश राजेंद्र काळे (वय-२०) यासह त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून केला आहे.या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणी चौकशीची जबाबदारी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकावर सोपवली होती.त्यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व पो.हे.कॉ.विजयकुमार वेठेकर,संदीप पवार,पोलिस नाईक शंकर चौधरी,विशाल दळवी,रविकिरण सोनटक्के,पो.ना.दीपक शिंदे,पो.कॉ.योगेश सातपुते,संभाजी कोतकर,त्यांच्यावर सोपवली होती.त्यांनी या प्रकरणी गांभीर्याने चौकशी करून प्रमुख आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान प्रमुख आरोपीस त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.मात्र पोलिसांनी आपला हिसका दाखवला असता तो पोपटासारखा बोलू लागला व त्याने आपल्या घरात लपवलेले दोन सोन्याचे मिनी गंठण,दोन सोन्याचे मंगळसूत्र असे ६० ग्रॅम वजनाचे दागिने काढून दिले आहे.त्याची कसून चौकशी केली असतात यांचेशी साथीदार म्हणून सोंड्या उर्फ आदित्य गणेश पिंपळे,रा.अशोक कारखाना,संदीप दादाहरी काळे,रा.वडाळा महादेव, व आणखी एक आरोपी असे तिघे मिळून केल्याचे उघड झाले आहे.वरील तिघांना विविध दोन ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.चौथा आरोपी मात्र फरार झालेला आढळून आला आहे.अटक आरोपी हे कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात वर्ग केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली आहे.
दरम्यान आय आरोपींच्या गुन्ह्याचा तपास केला असता यांच्यावर कोपरगावात शहर पोलिसांत (क्रं.२९३/२००२१,३००/२०२१ ) दोन गुन्हे दाखल केले आहेत.तर राहाता पोलीस ठाण्यात गु.र.क्रं.२३९/२०२१,लोणी पोलीस ठाणे ३७६/२०२१ असे एकूण चार गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत.