गुन्हे विषयक
कोपरगाव शहरातील ‘त्या’ गुन्ह्यात पोलिसांनी लावले ‘ऍट्रॉसीटीचे कलम’
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील १०५ हनुमान नगर या उपनगरातील रहिवासी असलेली एक मुलगी अंगणातील पाणी झाडून लोटत असताना त्याला त्याच भागातील आरोपी अमजद जाफर मनियार सह सहा जणांनी त्याला हरकत घेऊन ‘त्या’ मुलीस लोखंडी गजाने मारहाण केल्याची फिर्याद मुलीची पस्तीस वर्षीय आई यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.या घटनेत महिलेची मुलगी गंभीर जखमी झाली असून या घटनेत या आरोपीनी आक्षेपार्ह कृती करून आपल्या कुसंस्काराचे अभद्र प्रदर्शन केले होते या प्रकरणात आता जातीचा दाखला हजर झाल्याने पोलिसांनी या आरोपी विरुद्ध शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी ऍट्रॉसिटीचे कलम लावले असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
या घटनेत फिर्यादी महिलेची मुलगी हि जखमी झाली होती.यात या पीडित महिला व तिची मुलगी यांची बाजू घेऊन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.तर आपल्या सोयीची भूमिका घेणाऱ्या प्रस्थापित नेत्यांनी देशातील अन्य घटनेबाबत कंठघोष करणाऱ्यांनी नेहमी प्रमाणे आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती.व त्यांचे समर्थकांनी आपल्या नेत्यांच्या भूमिकेनुसारच सोयीस्कर मौन पाळले होते.त्याचे गांभीर्य पोलीस अधिकांऱ्यानी ओळखले होते.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी ३५ वर्षीय महिला व आरोपी अमजद मनियार यांचे घर शेजारी-शेजारीच आहे.दि.२६ ऑगष्ट २०२१ रोजी दुपारी ०४ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला व महिलेची मुलगी हि त्यांचे अंगण झाडत असताना त्यांच्या हातातील झाडूच्या सहाय्याने पाणी लोटीत असताना त्याचा आरोपीस राग येऊन त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपी अहमद मनियार याने त्याच्या हातातील लोखंडी गजाच्या सहाय्याने फिर्यादी माहिलेच्या उजव्या हातावर व पायावर मारून जखमी केले व आरोपी अमजद मनियार,रुबीना समजत मणियार,उजमा मनियार,जेबिन जरा मनियार,सोनू जलार मनियार यांनी फिर्यादीची मुलगी हिला लाथा बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी केली.व आरोपी अहमद मनियार याने फिर्यादी महिलेच्या वस्राला हाथ घालण्याचे निषिद्ध कृत्य केले होते व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप केला होता.या बाबत फिर्यादी महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२६३/२०२१भा.द.वि.कलम १४३,१४७,१४८,१४९,३५४,३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे दाखल केला होता.व त्यात पुढील कलम वाढवले होते.बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ८,१२ सह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ चे कलम ३(१),(डब्ल्यू)(आय),३,(२)(व्ही.अ) प्रमाणे वाढीव कलम लावले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.जी पवार हे करीत होते तथापि आता या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचेकडे सोपविण्यात आला आहे.मात्र या घटनेचे गांभीर्य ओळखून शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी यात वाढीव कलम लावून आरोपींवर कठोर कारवाई केली आहे.त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.