गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात एकाची विषारी औषध घेऊन आत्महत्या

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या वायव्येस साधारण वीस कि.मी.अंतरावर असलेल्या सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले इसम बाळासाहेब सुखदेव वाकचौरे (वय-५५) यांनी आपल्या राहत्या घरी दि.१७ ऑक्टोबर रोजी रात्री ११.४८ वाजे पूर्वी अज्ञात कारणाने विषारी औषध घेऊन आपली जीवन यात्रा सम्पवली आहे.
या प्रकरणी त्यांच्यावर उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
त्यांच्या मृत्यूला कारण झालेले औषध नेमके कोणते व त्यांनी ते का घेतले याचे कारण समजू शकले नाही.त्यांचा वीट भट्टीचा व्यवसाय होता.त्यांच्या पच्छात पत्नी,दोन मुले,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सांगवी भुसार येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.४६/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव याचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.संदीप बोठे हे करीत आहेत.