जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात कोरोनाचा प्रसार जोरात सुरु,आंदोलने जोमात ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनीधी)

राज्यात कोरोनाचा कहर आता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.त्यात रोज शुक्ल पक्षातील चंद्रकोरी प्रमाणे त्याला उतार येत आहे.कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५३१रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०८ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ५२३ रुग्ण निरंक निघाले आहे.तर नगर येथे ४७८ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०१ तर अँटीजन तपासणीत ०८ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०० असे एकूण अहवालात एकूण ०९ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १७ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर काल कोपरगाव शहरात तालुक्यातील एकही रुग्णांचे निधन झाले नाही हि समाधानाची बाब असून कोरोना लाट आता ओसरत आली असल्याचे दिसू लागले असताना आंदोलने मात्र जोरात सुरु झाली आहे.त्यामुळे आगामी काळात कायदा केवळ सामान्य माणसांनीं पाळायचा आहे असा चुकीचा संदेश दिला गेला आहे.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार ४०४ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ०९२ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २०३ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६४ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ९० हजार १३१ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०३ लाख ६० हजार ५२३ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १३.७६ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १२ हजार १०९ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.६२ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ६६ हजार १४८ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०३ हजार ४६७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ५७ हजार २९१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०५ हजार ३८९ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.

दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत असून आज तर कहर झाला असून भाजपच्या चक्का जाम आंदोलना निमित्त मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते जमा झालेले आढळले असून हा सर्व प्रकार तब्बल दोन तास तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या नाकाखाली टिचून सुरु होता.मात्र तरीही जमावबंदी कलम १८८ चे उल्लंघन झाल्याची कृती कोणालाही दिसली नाही हे विशेष ! हा कोरोनाचा प्रसार असाच होणार असेल तर आगामी काळात काय वाढून ठेवलेलं आहे न सांगितलेले बरे ! कोरोनाचा वर्तमानात डेल्टा प्लस हा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत असून त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला असून पुन्हा एकदा निर्बंध व संचारबंदी लागू शकते. त्यापासून नागरिकांनी सावध होणे गरजेचे असताना ‘तो’ सावधानतेचा संदेश त्याच पक्षाचे कार्यकर्ते राजरोस तुडवताना दिसून आले आहेत.त्यांच्या साठी कायदा नेमका कोणता आहे हे समजण्यास मार्ग नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close