आरोग्य
कोपरगावात कोरोनाचा प्रसार जोरात सुरु,आंदोलने जोमात ?
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनीधी)
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार ४०४ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ०९२ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २०३ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६४ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ९० हजार १३१ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०३ लाख ६० हजार ५२३ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १३.७६ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १२ हजार १०९ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.६२ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ६६ हजार १४८ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०३ हजार ४६७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ५७ हजार २९१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०५ हजार ३८९ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत असून आज तर कहर झाला असून भाजपच्या चक्का जाम आंदोलना निमित्त मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते जमा झालेले आढळले असून हा सर्व प्रकार तब्बल दोन तास तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या नाकाखाली टिचून सुरु होता.मात्र तरीही जमावबंदी कलम १८८ चे उल्लंघन झाल्याची कृती कोणालाही दिसली नाही हे विशेष ! हा कोरोनाचा प्रसार असाच होणार असेल तर आगामी काळात काय वाढून ठेवलेलं आहे न सांगितलेले बरे ! कोरोनाचा वर्तमानात डेल्टा प्लस हा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत असून त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला असून पुन्हा एकदा निर्बंध व संचारबंदी लागू शकते. त्यापासून नागरिकांनी सावध होणे गरजेचे असताना ‘तो’ सावधानतेचा संदेश त्याच पक्षाचे कार्यकर्ते राजरोस तुडवताना दिसून आले आहेत.त्यांच्या साठी कायदा नेमका कोणता आहे हे समजण्यास मार्ग नाही.