जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

रक्तदानासारखे दुसरे दान नाही-जिल्हा न्या.बोधनकर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशभरातील कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत आहे.त्या साठी कोपरगाव क्रेडाई संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले असून हे कार्य नक्कीच दखलपात्र असून रक्तदानासारखे दुसरे पवित्र दान असू शकत नाही असे प्रतिपादन कोपरगाव येथील जिल्हा स्तरीय न्यायालयाचे न्या.पराग बोधनकर यांनी कोपरगावात आयोजीत केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सदर प्रसंगी न्या.विकास मिसाळ व न्या.रफिक शेख,आदींनी रक्तदान केले असून रक्तदानाच्या इतिहासात प्रथमच न्यायधीशांसह एकूण १४१ नागरिकांनी त्यात सहभाग नोंदवला असून त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी क्रेडाईचे अध्यक्ष प्रसाद नाईक,दिनार कुदळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले होते.

कोपरगाव येथील व्यावसायिकांची क्रेडाईच्या वतीने लायन्स पार्क येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी या शिबिराचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या.सयाजी कोऱ्हाळे,कोपरगाव प्रथमवर्ग न्या.अभिजित डोईफोडे,न्या.विकास मिसाळ,न्या.रफिक शेख,कोपरगाव नगरपरिषदेचे नुकतेच बदली झालेले मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख वासुदेव देसले,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष विधीज्ञ जयंत जोशी,शंतनू धोर्डे,आदी प्रमुख मान्यवरांसह क्रेडाईचे अध्यक्ष प्रसाद नाईक,उपाध्यक्ष विलास खोंड,सचिव चंद्रकांत कौले, खजिनदार हिरेन पापडेजा,सिद्धेश कपिले,सदस्य राजेश ठोळे,संदीप राहातेकर,राजेंद्र शिरोडे,अमोल अजमेरे,प्रदीप मुंदडा,श्री.भारती,यश लोहाडे,याकूब शेख,मनीष फुलफगर,लायन्सचे अध्यक्ष प्रदीप साखरे,आदी मान्यवरांसह बहुसंख्या नागरिक उपस्थित होते.

सदर प्रसंगी न्या.विकास मिसाळ व न्या.रफिक शेख,आदींनी रक्तदान केले असून रक्तदानाच्या इतिहासात प्रथमच न्यायधीशानी सहभाग नोंदवल्याने त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी क्रेडाईचे अध्यक्ष प्रसाद नाईक,दिनार कुदळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close