आंदोलन
दोन वर्षांपासून रस्ता रखडला- थोरात यांचा आरोप

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोकमठाण येथील देवयानी डेअरी-कांचनवाडी ते कोकमठाण (ई.जि.मा.५) या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचे आ.आशुतोष काळे हस्ते भूमिपूजन होऊन दोन वर्ष उलटूनही पूर्ण शकले नाही.परिणामी ग्रामस्थांना याचा मोठा सामना करावा लागला असून अनेक अपघात होऊन नागरिकांचा हकनाक बळी जात असून वाहनाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.त्यामुळे सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पूर्ण करावे अशी मागणी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

“कोकमठाण,संवत्सर,सडे आणि परिसरातील इतर गावांतील नागरिकांसाठी कोपरगाव शहरात ये-जा करण्याचा हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे.विद्यार्थी,शेतकरी,नोकरदार,व्यापारी तसेच वाहनधारक मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा वापर करतात.मात्र,रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना दररोज प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.वर्तमानात या रस्त्यावर केवळ खडी टाकून ठेवण्यात आली असून,प्रत्यक्ष काम पूर्ण झालेले नाही.त्यामुळे वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे”-शरद थोरात,माजी अध्यक्ष,कोपरगाव तालुका भाजप.
कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था हा काही नवा विषय नाही.राष्ट्रीय महामार्गसह राज्य मार्ग आणि जिल्हा मार्गांची पुरती वाट लागली आहे.निधी येतो कुठे आणि जातो कोठे याचा कोणालाही थांगपत्ता लागताना दिसून येत नाही.होणाऱ्या निकृष्ट कामांवर कोणाचे नियंत्रण नाही.त्यामुळे ठेकेदार आणि संबंधित यंत्रणा यांची चांदी होते.मात्र ज्यांच्या साठी तो निधी मंजूर होतो त्यांचे नवे काही फिटत असताना दिसुन येत नाही.त्यामुळे प्रवासी,अवजड वाहतूकदार,सामान्य नागरिकांचे हकनाक बळी जाताना दिसून येत आहे.वित्तीय नुकसानीची मोजदाद नाही.अशीच अवस्था कोपरगाव कोकमठाण रस्त्याची झाली असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे संताप व्यक्त होत असून या प्रश्नाला भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये नुकतीच वाचा फोडली आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,”कोकमठाण,संवत्सर,सडे आणि परिसरातील इतर गावांतील नागरिकांसाठी कोपरगाव शहरात ये-जा करण्याचा हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे.विद्यार्थी,शेतकरी,नोकरदार,व्यापारी तसेच वाहनधारक मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा वापर करतात.मात्र,रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना दररोज प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.वर्तमानात या रस्त्यावर केवळ खडी टाकून ठेवण्यात आली असून,प्रत्यक्ष काम पूर्ण झालेले नाही.त्यामुळे वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे.विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर चिखल आणि खड्डे निर्माण झाल्याने परिस्थिती अधिक बिकट होते.दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची शक्यता वाढते,तर शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो.शेतमालाची वाहतूक करतानाही शेतकऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागतात.महत्त्वाच्या रस्त्याचे भूमिपूजन करून दोन वर्षे उलटूनही काम पूर्ण होत नसेल,तर नागरिकांनी गैरसोय किती काळ सहन करायची,असा सवालही उपस्थित होत आहे.केवळ भूमिपूजन आणि घोषणांपुरते विकासकाम मर्यादित न राहता ते प्रत्यक्षात पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून रखडलेले काम सुरू करावे,दर्जेदार पद्धतीने ते निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावे आणि कामास विलंब होण्याची कारणे स्पष्ट करावीत.तसेच संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका तपासून आवश्यक ती कार्यवाही करावी,अशी मागणी शरद थोरात यांनी शेवटी केली आहे.



