जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

शहरातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करा -…या संघटनेची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यात मटका,जुगार आदी अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्यामुळे तरुणाई भरकटत चालली असून यातून अनेक कुटुंबे उध्वस्त होत चालली असून पोलिसांनी
निपक्षपणे या अवैध व्यवसायांचा तातडीने बंडोबा करावा अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख गगन हाडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज कोपरगाव येथे पोलिस अधिकाऱ्यांना एक निवेदन देताना केली आहे.

कोपरगावातील अवैध व्यवसायांचा तातडीने बंडोबा करावा अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख गगन हाडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज कोपरगाव येथे पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे तो क्षण.

“मटका” व अवैध जुगाराचे जाळे कोपरगाव शहरातील  गल्लीबोळांत पसरले आहे.यामुळे गोरगरीब,सर्वसामान्य व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या व्यसनाच्या आहारी जाऊन आर्थिकदृष्ट्या उद्धवस्त होत आहे.कौटुंबिक वाद,गृहकलह आणि सामाजिक अस्वास्थ्य यात कमालीची वाढ झाली आहे.हे अवैध कृत्ये ही दिवसाढवळ्या सुरू असून राजकीय नेत्यांनी त्यांनाअभय देऊ नये.या शिवाय पोलीस प्रशासनाच्या निष्क्रीयतेबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे”-गगन हाडा,शहर प्रमुख शिवसेना, (उबाठा)

   कोपरगाव शहर परिसरात अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून पोलिस अधिकाऱ्यांचा गुन्हेगारांवर धाक राहिला असल्याचे दिसत नाही.परिणामी किरकोळ किरकोळ घटना गंभीर गुन्ह्याचे स्वरूप घेताना दिसून येत आहे.कोपरगाव शहरातील एका ठोक विक्रेत्याच्या दुकानाचे उद्घाटन करण्यास पालक मंत्री आले असताना त्यांना न जुमानता चोरट्यांनी एका कार्यकर्त्याच्या खिशावर डल्ला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे उघड झाले होते.परिणामी यात पोलिसांची नाचक्की झाली असल्याचे बोलले जात असून याची गंभीर दखल पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी घेतली आहे.त्यामुळे गुन्हेगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे तातडीने कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांनी तातडीची बैठक शहर पोलिस ठाण्यात घेतली होती.त्यावेळी त्यांनी पोलिस ठाण्याचे अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले असताना आज कोपरगाव शहर शिवसेनेने कोपरगाव येथील शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव दामले यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले आहे.

   सदर प्रसंगी कोपरगाव तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख श्रीरंग चांदगुडे,माजी तालुका प्रमुख गंगाधर रहाणे,शेतकरी तालुका प्रमुख धर्मा जावळे,विजय गोर्डे,विवेक कुलकर्णी,विकास गाडे,नंदू निकम,राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख बापू रांधवणे,भावेश थोरात आदीसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थिती होते.

  त्यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”कोपरगाव शहर व ग्रामीण परिसरात वर्तमानात बेकायदेशीर व अवैध धंद्यांचे प्रमाण वाढलेले आहे.दिवसेंदिवस या अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे मनोबल वाढले असून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.”मटका” व अवैध जुगाराचे जाळे घरोघरी आणि गल्लीबोळांत पसरले आहे.यामुळे गोरगरीब,सर्वसामान्य व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या व्यसनाच्या आहारी जाऊन आर्थिकदृष्ट्या उद्धवस्त होत आहे.कौटुंबिक वाद,गृहकलह आणि सामाजिक अस्वास्थ्य यात कमालीची वाढ झाली आहे.हे अवैध कृत्ये ही दिवसाढवळ्या सुरू असल्याने,पोलीस प्रशासनाच्या निष्क्रीयतेबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे.या अवैध धंद्यांना प्रशासकीय अभय अथवा राजकीय आश्रय लाभलेला असल्याचा आरोप होऊ लागला आहे.हे अवैध व्यवसाय करणारे घटक पोलीस प्रशासनाला हप्ते दिले जातात असा उघड प्रचार करून प्रशासनाची प्रतिमा मलीन करत आहेत.पूर्वी लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने व पोलीस प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे काही काळ हे अवैध धंदे बंद झाले होते.परंतु पुन्हा एकदा हे “मटका किंग” व असामाजिक तत्वे सक्रिय झाली आहेत.त्यामुळे जुगारात पैसे हरल्यानंतर सदरची भरपाई करण्यासाठी आरोपी चोरी करून आपला सामाजिक उपद्रव वाढवत असल्याचा आरोप केला आहे.दुष्काळाने आणखी त्यात भर पडली आहे.त्यामुळे पोलिसांनी निःपक्ष चौकशी करून या गुन्हेगारावर कारवाई करावी,राजकीय नेत्यांनी या गुन्हेगारांना अभय देऊ नये यात सुधारणा झाली नाही तर आगामी सात दिवसांत जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन आंदोलन केले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस प्रशासनाची राहील असा इशारा शेवटी शहर प्रमुख गगन हाडा यांनी दिला आहे.सदर निवेदनाच्या प्रति जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे,कोपरगावचे आ.आशुतोष काळे,विवेक कोल्हे,जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मुमक्का सुर्दशन आदींना दिले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close