आंदोलन
…या गावी गटार बंदिस्त करून सांडपाण्याची वाट लावा-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळ मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या समस्येमुळे पिण्याच्या पाण्याचा स्रोत दूषित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे सदर सांडपाण्याची विल्हेवाट लावून बंदिस्त गटारीची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थानी नुकतीच केली आहे.

“कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव ग्रामपंचायत हद्दीत उघडी गटार असल्यामुळे पिण्याचे पाणी वापर असलेल्या विहिरीचे जलस्रोत दूषित करत आहे.त्या परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देऊन विहिरीजवळ साचलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी,तसेच गटाराची योग्य व्यवस्था करून ते बंदिस्त करावे”-राहुल गायकवाड,कार्यकर्ते,शिरसगाव.
ग्रामीण भागातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे ही आरोग्याची आणि पर्यावरणाची मूलभूत गरज आहे.ग्रामीण सांडपाणी विल्हेवाटाची गरज असून सांडपाणी उघड्यावर साचल्यामुळे डासांची उत्पत्ती होत असते परिणामी मलेरिया,डेंग्यू,टायफॉइड आणि हगवण यांसारख्या जलजन्य व डासांमुळे पसरणाऱ्या रोगांचा धोका वाढतो.पाण्याच्या अयोग्य विल्हेवाटीमुळे सांडपाणी जमिनीमध्ये झिरपून किंवा विहिरी व बोरवेलच्या स्रोतांमध्ये मिसळते,ज्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होते.साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते आणि हवा,जमीन व स्थानिक जलस्रोत दूषित होत असतांत.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव ग्रामपंचायत हद्दीत उघडकीस आली आहे.त्या परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देऊन विहिरीजवळ साचलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी,तसेच गटाराची योग्य व्यवस्था करून ते बंदिस्त करावे,अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.पिण्याच्या पाण्याचा स्रोत सुरक्षित राहणे ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे.त्यामुळे संबंधित प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या अर्जाची दखल घेऊन त्वरित कार्यवाही न झाल्यास संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात येईल.तसेच ग्रामस्थांच्या वतीने शांततामय धरणे आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर राहुल गायकवाड,सलीम पटेल,इरफान पटेल,खलील पटेल,अमोल गायकवाड यांची नावे असून,गावातील ग्रामस्थांनी या निवेदनास पाठिंबा दिला असल्याचा कार्यकर्त्यांचा दावा आहे.ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या समस्येचे तातडीने निराकरण करावे,अशी मागणी करण्यात आली आहे.शिरसगाव-सावळगावचे ग्रामपंचायत अधिकारी सचिन वीर यांनी दिवाळी पर्यंत काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिले आहे.आश्वासन पूर्ण नाही झाल्यास आंदोलन केले जाईल असा ग्रामस्थांनी शेवटी इशारा दिला आहे



