जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

खरी संस्कृती समजून घेण्यासाठी निसर्गात जाणे आवश्यक -प्रा.निमसे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

“खरी संस्कृती आणि वारसा समजून घ्यायचा असेल,तर प्रत्येकाने निसर्गाच्या सान्निध्यात जाणे आवश्यक आहे.स्वतःला निसर्गाशी जोडून घेत नदी,झरे,पर्यावरण आणि जैवविविधतेची जाणीव करून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक व अहिल्यानगर येथील तत्वज्ञान विभागातील सहाय्यक प्रा.गणेश निमसे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

अहिल्यानगर येथील तत्वज्ञान विभागातील सहाय्यक प्रा.गणेश निमसे बोलताना दिसत आहेत.
  ‘नॉट मी बट यू ’‘स्वतःपेक्षा समाज प्रथम’ हे सांगून एन.एस.एस.चा विद्यार्थ्यांच्या जीवनातील उपयोग स्पष्ट केला आहे.समाजाचा विचार करून केलेली सेवा हीच खरी मानवता आहे.एन.एस.एस.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना चालना मिळते.श्रमप्रतिष्ठा ही अत्यंत महत्त्वाची असून पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे"-डॉ.माधव सरोदे,प्राचार्य,श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय,कोपरगाव.

    कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्घाटन प्रा.गणेश निमसे यांचे हस्ते करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे हे होते.

  सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे उपप्राचार्य डॉ.अर्जुन भागवत,विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ.घनश्याम भगत,डॉ.रंजना वर्दे,डॉ.प्रतिभा रांधवणे,डॉ. नामदेव आडमुठे,डॉ.बाळू वाघमोडे,प्रा.रवींद्र कोरे,प्रा.किरण पवार,प्रा.अनिता गोरे,प्रा.तेजस होन,प्रा.प्रसाद हाडोळे यांच्यासह महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  त्यावेळी पुढें  बोलताना ते म्हणाले की,”समाजसेवेतून व्यक्तिमत्त्व विकास व चारित्र्यसंवर्धन होत असते.त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ उपक्रमापुरती मर्यादित न ठेवता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवणे आवश्यक आहे.”२४ सप्टेंबर १९६९ रोजी महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना करण्यात आली होती.प्रारंभी देशातील ३७ विद्यापीठांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी,सेवाभाव आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा एन.एस.एस.चा मुख्य उद्देश आहे.एखादी गोष्ट समाजासाठी उपयुक्त ठरत नसेल,तर कालांतराने ती नामशेष होते.त्यामुळे बदलत्या काळानुसार तरुणांनी सामाजिक प्रश्न समजून घेऊन त्यावर सकारात्मक कृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा.निमसे यांनी शेवटी केले आहे.

  या कार्यक्रमाचे प्रास्तविक उपप्राचार्य डॉ.अर्जुन भागवत यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी प्रा.महेश दिघे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close