जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

“नंगे को खुदा डरता है”

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (नानासाहेब जवरे)

    गेल्या 26 वर्षापासून अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या अत्यंत दयनीय आणि खड्ड्यांच्या अवस्थेमुळे त्रस्त झालेला हा रस्ता पूर्ण करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी व आंदोलकांनी विविध अनोखे निषेध केले आहे.यात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळे झेंडे दाखवणे,रस्त्याचे श्राद्ध घालणे,दशक्रिया विधी करणे यांसारख्या आंदोलनांचा समावेश आहे,मात्र यावर बहुधा प्रशासन आणि राजकीय नेते यांचे लक्ष वेधलं आणि पोट भरले जात नसल्याने आणि त्यांना जनतेने या महामार्गासाठी मोठे काही विशेष करावे यासाठी वाट पाहत असावे असे दिसून येत असून ती गरज आता कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे हे 25 ऑगस्ट पासून करणार असून त्यांनी बहुधा “नंगे को खुदा डरता है” ही म्हण डोळ्यासमोर ठेऊन कोपरगाव ते अहिल्यानगरपर्यंत अर्धनग्न आंदोलनाचा इशारा दिला आहे.त्यामुळे आता प्रशासन आणि नेते काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

उत्तरेतील नेते वर्तमानात दिसायला मोठे असले तरी त्यांचा दळभद्रीपणा उघड करताना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी,”चक्क ठेकेदारांकडे टक्केवारी मागण्याचे काम करत असल्याचे सांगून त्यांची लायकी दाखवून दिली होती.मात्र त्यांना कधी काळ्या यादीत कोणी टाकून हे काम एकदाचे संपून टाका असे कोणालाही वाटत नाही.तर तत्कालीन उत्तरेतील एका आमदार महोदयांनी नितीन गडकरी यांना चक्क या मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी करून आपल्या अकेलेचे दिवाळे काढले होते.आता तर एका एका तालुक्याला दोन दोन आमदार आहे.मंत्री आहे,पालक मंत्री आहे,खासदार आहे.पण रस्त्याला काही मुहूर्त निघत नाही.उलट संतापून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर ही मंडळी गुन्हे दाखल करून आपले निर्दयीपण दाखवून देत आहे.त्यामुळे आगामी काळात येथील भूमीतून बंडाळी जन्माला आली तर दोष येथून नेत्यांचा असेल सामान्य जनतेचा नाही हे येथे लक्षात घेणे गरजेचे आहे.

    गेल्या सव्वीस वर्षांपासून विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी या मार्गाच्या चार पदरी रस्त्याचे नगरमध्ये येउन उद्घाटन केले होते.मात्र अद्याप हा रस्ता कधीही पूर्ण झाला नाही. परिणामी नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था झाली आहे.मृत्यूचा सापळा बनलेल्या नगर-मनमाड महामार्गावर महाकाय खड्डे पडल्याने साईभक्तांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.राष्ट्रीय महामार्गाकडे हा रस्ता वर्ग होऊनही या महामार्गाची वारंवार निविदा प्रक्रिया रखडत आणे आणि रखडली आहे.तर काही महिन्यांपूर्वी ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्याने महामार्ग खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे.शिवाय अहिल्यानगर-मनमाड महामार्ग केंद्राकडे वर्ग झाला असून कामाची निविदा निघाली.त्यानंतर कामही सुरू झाले होते.मात्र ठेकेदाराने काम अर्धवट सोडून दिले आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे.याचा फटका प्रवाशांना बसत असून अनेकदा अपघात होऊन प्रवाशांना जिव गमवावा लागत असल्याचे समोर आले आहे.कोपरगाव येथील बेट आणि पुणतांबा फाटा तसेच सावळीविहिर या ठिकाणी उड्डाण पूलाचे काम कधी पूर्ण होणार हे ब्रम्हदेवालाच माहिती.बातम्या आल्या की नेते या महामार्गावर येऊन फोटोसेशन करून जनतेची वर्तमान पत्रे आणि सोशल मिडियात करमणूक करतात आणि पुन्हा गायब होतात.ठेकदारांनी कधी कमी दराने निविदा भरल्या तर कधी त्यांनी बँकेला फसवले असल्याच्या बातम्या येतात.सन-2019 साली लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी केंद्रीय रस्ते विकास मंत्री  नितीन गडकरी यांनी तर येथील नेत्यांचे पूर्ण वस्त्रहरण केले होते.परिणाम म्हणून आता तर आगामी काळात अधिकारी व यंत्रणेचा निषेध म्हणून पायी व अर्धनग्न अवस्थेने नगरकडे कूच करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.नगर-मनमाड रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे आणि खराब कामामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.बरेच ठिकाणे एकेरी वाहतूक होत असल्याने वाहनाची मोठी कोंडी होत आहे.वर्तमान रस्त्याच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही रस्ता पहिल्याच पावसात पुन्हा उखडला गेला आहे.आणि जात आहे.डांबर आणि खडी यांची थेट भेट अशी होतच नाही.आणि भ्रष्टाचार ते होऊ देत नाही परिणामी रस्ते पुढे होत असताना मागे उखडत चालतात असा अनुभव आहे.वारंवार निवेदने देऊनही ठोस कृती होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.नागरिकांनी हातावर काळे झेंडे बाळगून प्रशासनाचा जाहीर निषेध केला.यापूर्वी रस्त्याचे ‘श्राद्ध’ आणि ‘दशक्रिया विधी’ सारखे अनोखे प्रकार झाले आहेत.प्रशासनाचे वस्त्रहरण करण्यासाठी अर्धनग्न व पायदळ आंदोलनाची तयारी स्थानिकांकडून दर्शवली जात आहे.

  

कोपरगाव आणि वैजापूर शहराला जोडणारा साईबाबा नाका ते कोपरगाव रेल्वे स्थानकापर्यंत होणारा रस्ता केवळ संजीवनी कारखान्यापर्यंतच झाला होता त्या रस्त्याला केंद्रीय रस्ते निधीतून सन-2016 साली 20 कोटींचा निधी मंजूर झाला होता.ते काम कसे झाले हे कोणा ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही.तेथील खड्ड्यांनी अवघ्या काही महिन्यात उचल खाल्ली होती.साईड गटारी तर काम सुरू असताना ठेकेदाराची फारकत मागत होत्या.आता पुन्हा एक याच विभागाने 20 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी माहिती अधिकारातून दिली आहे.त्यामुळे आता हा रस्ता कुठपर्यंत होणार की महिला महाविद्यालयापर्यंत निधी संपून जाणार हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

    दरम्यान वर्तमानात येथील नेते दिसायला मोठे असले तरी त्यांचा दळभद्रीपणा उघड करताना चक्क ठेकेदारांकडे टक्केवारी मागण्याचे काम करत असल्याचे सांगून त्यांची लायकी दाखवून दिली होती.मात्र त्यांना कधी काळ्या यादीत कोणी टाकून हे काम एकदाचे संपून टाका असे कोणालाही वाटत नाही.तर तत्कालीन उत्तरेतील एका आमदार महोदयांनी नितीन गडकरी यांना चक्क या मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी करून आपल्या अकेलेचे दिवाळे काढले होते.आता तर एका एका तालुक्याला दोन दोन आमदार आहे.मंत्री आहे,पालक मंत्री आहे,खासदार आहे.पण रस्त्याला काही मुहूर्त निघत नाही.उलट संतापून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर ही मंडळी गुन्हे दाखल करून आपले निर्दयीपण दाखवून देत आहे.

सामाजिक कार्यकर्ते संजय काळे.

   त्यामुळे आता या राष्ट्रीय महामार्गासाठी आणि राज्य मार्गासाठी सर्वच नागरिकांनी घराबाहेर येऊन टेंबे घेण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचे नागरिकांत बोलले जाऊ लागले आहे.मध्यंतरी तर एका बालकाला घेऊन जाणाऱ्या बापाला अपघात झाला होता.त्यात ते बालक जखमी झाले त्याने उपचार करून येऊन रस्त्यावर थेट फेसबुक लाईव्ह येऊन येथील नेत्याना आणि अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली पण संवेदशून्य बनलेल्या आणि केवळ पैशाचे भूक बळी असलेल्या नेत्यांनी आता कंबरेचे सोडून डोक्याला बांधले असल्याचे दिसू लागले आहे.फक्त पैसे आणि लाच यापलिकडे त्यांनी डोळ्यावर फक्त ढापणे बांधली असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पुकारलेले आंदोलन समर्थनीय म्हटले तर वावगे ठरवता येणार नाही.वर्तमान निर्लज्ज व्यवस्थेला ठिकाणावर आणण्यासाठी तीच कृती योग्य ठरते हा इतिहास आहे.मराठीत एक म्हण आहे,”नंगे को खुदा डरता है” ही म्हण काही खोटी नाही.बहुधा हाच विचार करून संजय काळे यांनी हा निर्णय घेतला असल्याची शक्यता अधिक.त्यामुळे त्यांचे आंदोलन हे समर्थनीय ठरत आहे.अनेक नागरिकांचे बळी गेले किती जायबंदी झाले याची मोजदाद नाही.”माहिती अधिकारात त्याबाबत माहिती मागितली तर अधिकारी एवढी जुनी माहिती क्लिष्ट असल्याचे सांगून वाहतूक शाखेचे अधिकारी आणि पोलिस यंत्रणा त्यास नकार देतात.आणि जनतेचे न्यायिक दरवाजे बंद करण्याचे पाप करत आहे.त्यामुळे तो दिवस फार दूर नाही.ज्या दिवशी जनता आता घराबाहेर पडून नेत्यांच्या घराकडे प्रयाण करील आणि पुन्हा एकदा उत्तर नगर जिल्ह्यात फ्रान्सची राज्यक्रांती होईल.राहुरीतील वकील संघाचे आंदोलन ही त्याची सुरुवात आहे.कोपरगाव वकील संघाकडून बंडाळी झाली तर आता आश्चर्य वाटू देऊ नये.

  दरम्यान एका मिळालेल्या माहितीतून कोपरगाव आणि वैजापूर शहराला जोडणारा साईबाबा नाका ते कोपरगाव रेल्वे स्थानकापर्यंत होणारा रस्ता केवळ संजीवनी कारखान्यापर्यंतच झाला होता त्या रस्त्याला केंद्रीय रस्ते निधीतून सन-2016 साली 20 कोटींचा निधी मंजूर झाला होता.ते काम कसे झाले हे कोणा ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही.तेथील खड्ड्यांनी अवघ्या काही महिन्यात उचल खाल्ली होती.साईड गटारी तर काम सुरू असताना ठेकेदाराची फारकत मागत होत्या.आता पुन्हा एक याच विभागाने 20 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी माहिती अधिकारातून दिली आहे.त्यामुळे आता हा रस्ता कुठपर्यंत होणार की महिला महाविद्यालयापर्यंत निधी संपून जाणार हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close