जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

आकारी पडीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)  

  श्रीरामपूर तालुक्यातील आकारी पडीत नऊ गावांच्या वतीने शेतकरी संघटना व आकारी पडित शेतकरी संघटना यांचे वतीने प्रलंबित मागण्यासाठी दि.१४ ऑगस्ट रोजी ॲड.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली हरेगाव शेती महामंडळाच्या कार्यालयासमोर,’शेतकरी मेळावा व अन्नत्याग आंदोलन’ सुरू करण्यात आले असून आज आंदोलनाचा तिसरा दिवस असताना आज राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आंदोलनस्थळी ॲड.अजित काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेऊन हा प्रश्न मिटविण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे करून दिले असून त्यांनी,”आपण आगामी मंगळवार दि.25 ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत हा विषय मंजूर करणार असून तो पुन्हा राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवून देऊन त्याला मंजुरी देणार आहे” असे असल्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे आंदोलन स्थगित केले असल्याची घोषणा अँड.अजित काळे यांनी केली आहे.

दरम्यान आज दुपारी ०४.३० वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आंदोलनस्थळी ॲड.अजित काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेऊन हा प्रश्न मिटविण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे करून दिले असून त्यांनी,”आपण आगामी मंगळवार दि.25 ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत हा विषय मंजूर करणार असून तो पुन्हा राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवून देऊन त्याला मंजुरी देणार आहे” असे असल्याचे आश्वासन दिले आहे. 

  उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील ०९ गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी जवळपास सात हजार पाचशे एकर मूळ शेतकऱ्यांच्या वारसांना देण्याचा आदेश १४ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ऍड.अजित काळे यांच्या जनहित याचिकेच्या माध्यमातून दिला होता त्यात राज्य शासनाला गतवर्षी ०२ महिन्यात याबाबतचा कायदा करून मूळ मालकांच्या वारसांना जमिनी देण्याचे आदेशित केलेले असता त्यास जवळपास दोन वर्षे उलटत आले आहे तरीही उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली तर नाहीच उलट न्यायालयाचा आदेशाचा अवमान करत शेती महामंडळाने सदर चार हजार एकर जमिनी श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना सार्वजनिक व खाजगी उद्योजकांच्या घशात घालण्याचे प्रयोजन मोठ्या प्रमाणात सुरू आहे.त्यामुळे या नऊ गावातील शेतकऱ्यांत मोठा संताप व्यक्त होत आहे.परिणामी या भागातील शेतकऱ्यांनी दिनांक 14 ऑगस्ट रोजी पासून आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.त्यात शेती महामंडळाच्या हरिगांव मळा पंचक्रोशीतील शिरसगाव,वडाळा महादेव,ब्राम्हणगांव,उंदीरगांव,खैरी निमगांव,खानापूर,माळवाडगांव,मुठेवाडगांव या ९ गावातील आकारी पडीत महिला आणि शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अँड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखालील आंदोलन सुरू केले होते त्यात तिसऱ्या दिवशी ही यश मिळाले असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान आज नऊ गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांच्या मुलानी आज श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीत असलेल्या उंच पाण्याच्या टाकीवर चढून आपल्या मागण्यांसाठी शोले पद्धतीचे आंदोलन करून माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दरम्यान आज नऊ गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांच्या मुलानी आज श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीत असलेल्या उंच पाण्याच्या टाकीवर चढून आपल्या मागण्यांसाठी शोले पद्धतीचे आंदोलन करून माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे.त्यावेळी प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली आहे.

  दरम्यान आज आंदोलनाचा तिसरा दिवस असताना अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. विशेषतः आज शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत हरेगाव येथील मळ्यात जाऊन ॲड.अजित काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे.शिवाय आपण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून हा प्रश्न धसास लावण्यासाठी त्यांना आग्रह धरणार असल्याचे आश्वासन दिले आहे.हा प्रश्न आपल्याला आपण पहिल्यांदा निवडून आलो तो पासून माहिती आहे.आवश्यक त्यावेळी आपण या शेतकरी संघटनेला व ॲड.अजित काळे यांना मदत केली आहे.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडिपठाने आदेश दिलेला असतां हा तिढा अद्याप सरकार का सोडत नाही या बाबत आपण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे.गरज पडली तर आपण राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून हा लढा कसा संपवता येथील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आंदोलनस्थळी जाहीर केले आहे.त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.त्यावेळी शिवसेनेचे ग्राहक सेनेचे माजी जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर यांनी भेट दिली आहे.

शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी दुपारी 1.30 वाजता आंदोलनस्थळी जाऊन ॲड.अजित काळे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे हा प्रश्न उपस्थित करून सोडवणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

  दरम्यान आज या नऊ गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला निळवंडे कालवा कृती समिती,अहिल्यानगर-नाशिक,गोदावरी वाढीव पाणी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य,जनमंगल ग्रामविकास संस्था जवळके,तालुका कोपरगाव आदींच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला असून आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे आश्वासन दिले आहे.

  दरम्यान आज श्रीरामपूर तालुक्यातील आकारी पडीत नऊ गावांच्या वतीने शेतकरी संघटना व आकारी पडित शेतकरी संघटना यांचे वतीने प्रलंबित मागण्यासाठी दि.१४ ऑगस्ट रोजी ॲड.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली हरेगाव शेती महामंडळाच्या कार्यालयासमोर,’शेतकरी मेळावा व अन्नत्याग आंदोलन’ सुरू करण्यात आले असून आज आंदोलनाचा तिसरा दिवस असताना शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी दुपारी 1.30 वाजता आंदोलनस्थळी जाऊन आपला पाठिंबा दिला असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे हा प्रश्न उपस्थित करून सोडवणार असल्याचे आश्वासन दिले आहे.वेळ प्रसंगी आपण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटणार असल्याचे सांगितले आहे.

  दरम्यान आज नऊ गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांच्या मुलानी आज श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीत असलेल्या उंच पाण्याच्या टाकीवर चढून आपल्या मागण्यांसाठी शोले पद्धतीचे आंदोलन करून माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे.त्यावेळी प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली आहे.तर आज आंदोलनाचा तिसरा दिवस असल्याने अनेक अस्वस्थ आंदोलनकर्त्या उपचारार्थ हलविण्यात आले असल्याचे दिसून आले आहे.

  दरम्यान आज या नऊ गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला निळवंडे कालवा कृती समिती,अहिल्यानगर-नाशिक,गोदावरी वाढीव पाणी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य,जनमंगल ग्रामविकास संस्था जवळके,तालुका कोपरगाव आदींच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला असून आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे आश्वासन दिले आहे.

   दरम्यान आज दुपारी ४.३० वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आंदोलनस्थळी ॲड.अजित काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेऊन हा प्रश्न मिटविण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे करून दिले असून त्यांनी,”आपण आगामी मंगळवार दि.२५ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत हा विषय मंजूर करणार असून तो पुन्हा राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवून देऊन त्याला मंजुरी देणार आहे” असे असल्याचे आश्वासन दिले आहे.मात्र यावर ॲड.अजित काळे यांनी जर हा विषय आगामी आश्वासन दिलेल्या तारखेस संपला नाही तर आपण पुढील ०१ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू करू असा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close