धार्मिक
श्री क्षेत्र पुणतांब्यासाठी…या दिंडीचे प्रस्थान !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र भऊर येथून श्रीक्षेत्र पुणतांबा असा पायी दिंडी एकदिवसीय सोहळा रविवार दि.9 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती या दिंडीचे मार्गदर्शक व कीर्तनकार ह.भ.प.संजयजी महाराज जगताप यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

श्री क्षेत्र पुणतांबा हे गाव महान योगी संत चांगदेव महाराजांची संजीवन समाधी आणि अनेक प्राचीन मंदिरांसाठी ओळखले जाते.चौदाशे वर्षे तपश्चर्या केलेले महान योगी संत चांगदेव यांनी पुणतांबा येथे माघ वद्य ३ रोजी संजीवन समाधी घेतली.हे त्यांचे चौदावे व शेवटचे ठिकाण मानले जाते.संत चांगदेव यांच्या समाधी मंदिरासमोरच हे एक प्राचीन व सुंदर शिवमंदिर आहे.गोदावरी नदीच्या काठावर असलेले हे स्वयंभू देवीचे मंदिर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
श्री क्षेत्र पुणतांबा हे महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात गोदावरी नदीकाठी वसलेले एक प्रसिद्ध ऐतिहासिक व धार्मिक ठिकाण मानले.हे गाव महान योगी संत चांगदेव महाराजांची संजीवन समाधी आणि अनेक प्राचीन मंदिरांसाठी ओळखले जाते.चौदाशे वर्षे तपश्चर्या केलेले महान योगी संत चांगदेव यांनी पुणतांबा येथे माघ वद्य ३ रोजी संजीवन समाधी घेतली.हे त्यांचे चौदावे व शेवटचे ठिकाण मानले जाते.संत चांगदेव यांच्या समाधी मंदिरासमोरच हे एक प्राचीन व सुंदर शिवमंदिर आहे.गोदावरी नदीच्या काठावर असलेले हे स्वयंभू देवीचे मंदिर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.येथील गोदावरी नदीचा परिसर शांत,रमणीय आणि पवित्र मानला जातो.येथे धार्मिक व अंत्यसंस्कार विधी देखील केले जातात.याच ठिकाणी संत मुक्ताबाई आणि भावंडांनी संत चांगदेव महाराज समाधीत असताना त्यांच्या परवानगीविना मृत व्यक्तींना जिवंत करून त्यांना आव्हान दिले होते.येथूनच आपली योगशक्ती दाखवून देण्यासाठी संत चांगदेव महाराज वाघावर बसून हातात सापाचा चाबूक घेऊन आळंदीला गेले होते.त्याक्षणी संत धान्येश्वर आणि भावंडांनी निर्जीव भिंत चालवून संत चांगदेवांचे गर्वहरण केले होते.त्यामुळे या जागेला वारकरी पंथात मोठे स्थान दिले जाते.या ठिकाणी दर वर्षी राज्यातून विविध ठिकाणाहून दिंड्या येत असतांत.यातील श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पुणतांबा असा पायी दिंडी सोहळा आयोजित केला जातो.यावर्षी रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी आठ वाजता श्री रोकडेश्वर हनुमान मंदिर श्रीक्षेत्र भऊर येथून या दिंडी सोहळ्याचे रथ पूजन व श्रींचे पूजन करून प्रस्थान झाले होते.उद्या आषाढ कृष्ण कामिका एकादशीला दुपारी हा दिंडी सोहळा श्रीक्षेत्र पुणतांबा येथे पोहोचणार आहे.श्रीक्षेत्र पुणतांबा येथे पवित्र गोदास्नान व गंगापूजन,आरती,दर्शन,आदी धर्मिक कार्यक्रम होणार आहे.तसेच रस्त्याने अभंग,भजने,भक्ती गीते,गवळणी,टाळ मृदंगाच्या निनादात नाचत गात हा दिंडी सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात आयोजित करण्यात आला आहे.या पायी दिंडी वारीला मोठे महत्त्व आहे.

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला यात्रा झाल्यानंतर आषाढ महिन्यातील पुढील पंधरा दिवसांनी येणाऱ्या कृष्ण पक्षातील एकादशीला श्रीक्षेत्र पुणतांबा येथे मोठी यात्रा भरते.पवित्र व प्रसिद्ध श्री क्षेत्र पुणतांबा येथे उद्या रविवार 9 ऑगस्ट 2026 रोजी मोठी यात्रा भरत असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अनेक छोट्या मोठ्या दिंड्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथे येणार आहेत.श्रीक्षेत्र पंढरपूर येथे ज्यांना वारीला जाता आले नाही ते श्रीक्षेत्र पुणतांब्याची पायी वारी करतात.तसेच जे पंढरपूरला पायी वारीत गेलेले असतात.ते सुद्धा श्रीक्षेत्र पुणतांबा येथे पायी वारी करून खऱ्या अर्थाने आपल्या पायी वारीची सांगता करतात.त्यामुळे श्रीक्षेत्र पुणतांबा येथे मोठ्या संख्येने वारकरी येत असतात.रस्त्यामध्ये काही अन्नदात्याकडून चहा,फराळ होणार असून रस्त्याने भजन, पूजन आरती आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहे.तरी या दिंडी सोहळ्याचा,धार्मिक कार्यक्रमांचा वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा व दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहनही प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी शेवटी केले आहे.



