जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

विवाहितेचा मारहाणीत मृत्यू,अकस्मात मृत्यूची नोंद,नातेवाईक संतप्त!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
  
   कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीत काल रात्री रात्री 10.30 वाजेच्या सुमारास पती,सासू,सासरा यांनी केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेचा मोठा रक्तस्राव होऊन त्यात वैशाली किरण रानोडे (वय-27) ही गंभीर जखमी होऊन तिचा उपचारादरम्यान लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात आज पहाटे 04 वाजता मृत्यू झाला असल्याची खळबळजनक माहिती मयत मुलीच्या चुलत भाऊ दिपक प्रकाश शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.मात्र याबाबत गुन्हा दाखल करण्यात पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.त्यामुळे शहर पोलिस ठाण्यात तणाव निर्माण झाला असल्याची खबर आहे.

मयत महिला वैशाली किरण रानोडे हिचे छायाचित्र.

दरम्यान मयत महिला वैशाली रानोडे हिचे लग्न जानेवारी-2021 साली वाजतगाजत झाले होते.तिच्या पश्चात पती,एक मतीमंद चार वर्षाचा मुलगा,सासू,सासरा असा परिवार आहे.तर माहेरी आई,एक बहीण असून वडील हे सन-2021 साली विवाहानंतर वारले असल्याची माहिती हाती आली आहे.या घटनेने संवत्सर आणि पढेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

   याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”विवाहित महिलांवरील अत्याचार ही एक अत्यंत गंभीर व चिंतेची सामाजिक समस्या बनली आहे.राष्ट्रीय फॅमिली हेल्थ सर्व्हे नुसार देशातील सुमारे ३२% विवाहित महिलांना कधी ना कधी पती किंवा घरच्यांकडून शारीरिक किंवा लैंगिक हिंसेचा सामना करावा लागतो,ज्यामध्ये सर्वाधिक प्रमाण घरगुती व मानसिक हिंसाचाराचे आहे.त्याची कारणे ही साधारणपणे हुंड्यासाठी होणारा शारीरिक व मानसिक छळ,पती किंवा कुटुंबाकडून व्यसन आणि दारूच्या आहारी जाऊन होणारी हिंसा,महिलांवर नियंत्रण ठेवण्याची आणि त्यांना दुय्यम लेखण्याची पुरुषसत्ताक मानसिकता,आर्थिक परावलंबन आणि सामाजिक दबावामुळे अत्याचाराविरुद्ध आवाज न उठवणे आदी कारणे जाणली जातात.कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत अशीच एक घटना उघडकीस आली असून यातील पढेगाव माहेर असलेली मयत महिला वैशाली हिला रात्री 10.30 वाजता अज्ञात कारणाने त्याचा पती किरण बाळासाहेब रानोडे याने त्या महिलेची सासू आणि सासरा आदींनी ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे माहिती असतानाही तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचा आरोप केला आहे.तिचा तिच्या बेडवरच मोठा रक्तस्राव होत असताना नजीकच्या काही हितचिंतकांनी याची खबर तिच्या माहेरी पढेगाव येथे दूरध्वनीवरून कळवली होती.त्यांनी खातरजमा करण्यासाठी तिच्या सासरच्या मंडळींना भ्रमणध्वनी केला असता त्यांनी तिला थंडी,ताप आला असल्याची बतावणी त्यांनी केली होती.मात्र त्यांनी त्यांचे म्हणण्यावर विश्वास न ठेवता तिच्या राहत्या घरी गोदावरी डाव्या कालव्यानाजिक संवत्सर येथे असलेल्या वस्तीवर धाव घेऊन परिस्थिती पाहिली होती.त्यावेळी ती तिच्या बेडवर गंभीर अवस्थेत पडली होती.मारहाणीमुळे तिचा मोठा रक्तस्राव झालेला त्यांना आढळून आला होता.त्याबाबत त्यांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता,”तिने तातडीने मला दवाखान्यात घेऊन चला,व उपहार करा” अशी विनवणी केली होती.त्याप्रमाने यांनी तातडीने एक गाडी बोलवून तिला कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात संदर्भांकित केले होते.त्या ठिकाणी तिला रात्री 02 वाजेच्या सुमारास भरती केले होते,उपचार सुरू असताना तिचा आज पहाटे 04 वाजता मृत्यू झाला असल्याचा आरोप संबंधित नातेवाईकांनी केला आहे.

   

कोपरगाव शहर पोलिस ठाण्यासमोर मयत महिलेच्या पती,सासू,सासरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी झालेली गर्दी दिसत आहे.

दरम्यान या घटनेबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे यांचेशी उशिरा संपर्क स्थापित झाला असता त्यांनी,”या घटनेला आपण गांभीर्याने घेतले असून संबंधितांचे जाबजबाब नोंदवून कारवाई सुरू केली असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे मयत मुलीच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  दरम्यान त्यांनी याबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात संपर्क केला असता पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून याबाबत गुन्हा दखल करण्यास नकार दिला असल्याचे आरोप केला आहे.दरम्यान याबाबत नातेवाईकांनी तिचे शव ताब्यात घेऊन पोलिस ठाण्याचे समोर आणून गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला असल्याची माहिती हाती आली आहे.याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी याबाबत मयत महिला वैशाली रानोडे हिचा चुलत भाऊ दिपक शिंदे यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती अन्य नातेवाईकांनी दिली आहे.तर या प्रकरणी गुन्हा दखल करण्यास पोलिसांवर राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.आता कोपरगाव तालुका पोलिस अधिकारी काय भूमिका घेणार याकडे पढेगाव येथील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.आमचे प्रतिनिधीने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दूरध्वनी केला असता संपर्क स्थापित होऊ शकला नाही.मात्र कनिष्ठ अधिकाऱ्याने सदर नातेवाईक पोलिस ठाण्यात आले असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.

  दरम्यान मयत महिला वैशाली रानोडे हिचे लग्न जानेवारी-2021 साली वाजतगाजत झाले होते.तिच्या पश्चात पती,एक मतीमंद चार वर्षाचा मुलगा,सासू,सासरा असा परिवार आहे.तर माहेरी आई,एक बहीण असून वडील हे सन-2021 साली विवाहानंतर वारले असल्याची माहिती हाती आली आहे.या घटनेने संवत्सर आणि पढेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close