जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
व्यक्ती विशेष

…या वाढदिवसाला अजित पवार नसल्याची खंत !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
  
   आपल्या प्रत्येक वाढदिवशी सकाळी साडेसहा वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छांचा फोन यायचा ही अनेक वर्षांची परंपरा होती.मात्र ती प्रथमच खंडित झाली असून त्यांचे या जगात नसणे ही मोठी व मनाला असह्य वेदना देणारी पिडा असल्याचे प्रतिपादन आज आ.आशुतोष काळे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिली आहे.

दरवर्षी माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार शुभेच्छामुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत होत होता आपले वाढदिवस दरवर्षी येतील,पण अजितदादा परत येणार नाहीत,आणि त्यांच्यासारखा माणूस पुन्हा होणार नाही असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी या प्रसंगी केले आहे.

   कोपरगाव येथील कृष्णाई बॅन्क्वेट हॉलमध्ये त्यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि समर्थकांनी कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.या वाढदिवसानिमित्त आयोजित शुभेच्छा सोहळ्यासाठी कोपरगाव मतदारसंघातून बहुसंख्य कार्यकर्ते,पदाधिकारी आणि नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

वाढदिवस शुभेच्छांच्या सत्काराला उत्तर देताना आ.काळे दिसत आहे.

   त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”कार्यकर्त्यांचा उत्साह,जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद पाहता वाढदिवस साजरा करावा की नाही,अशा द्विधा मनःस्थितीत होतो.मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा मान राखण्यासाठी आणि जनतेचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.एका बाजूला जनतेचे अपार प्रेम आणि विश्वास आहे;पण दुसऱ्या बाजूला अजित दादा नसल्याची पोकळी मनाला सतत अस्वस्थ करते.त्यांच्या शुभेच्छांशिवाय साजरा झालेला हा पहिला वाढदिवस आयुष्यभर वेदना देत राहील.आजही प्रत्येक क्षणी त्यांची आठवण येते,असे सांगताना त्यांनी खंत व्यक्त त्यांनी शेवटी केली आहे.

  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close