आरोग्य
पावसाळ्यातील आजार टाळण्यासाठी उपाययोजनांची गरज

न्यूजसेवा
कोपरगांव -(प्रतिनिधी)
पावसाळ्यातील संभाव्य आजारांचा प्रसार वाढल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी पुढे काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाज घेवून प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरात कुठेही डासांची पैदास होणार नाही याची दखल घेऊन आरोग्य विभागाने पावसाळयातील संभाव्य आजार टाळण्यासाठी तातडीने उपाय योजना करा असे निर्देश आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव पंचायत समितीत एका बैठकीत बोलताना दिले आहेत.

“मागील पाच वर्षांत कोपरगाव तालुक्यात आरोग्य विभागासाठी जितकी कामे मंजूर करून आणली तितकी कामे यापूर्वी कधीच झाली नव्हती.पूर्वी केवळ घोषणा झाल्या मात्र प्रत्यक्ष कामे झाली नाहीत.सध्या कोपरगाव शहरात १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम वेगाने सुरू आहे.माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झाले आहे.याशिवाय संवत्सर येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असून संवत्सरचे प्राथमिक आरोग्य केंद्र कोकमठाण येथे स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे.सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालयात जातात.त्यामुळे तेथील आरोग्य व्यवस्था अत्यंत सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत आहे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी,पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी एकात्मिक आरोग्य वर्धिनी समिती स्थापन केली आहे. ही समिती मंत्रालयापासून ते स्थानिक स्तरापर्यंतच्या आरोग्य संस्थांवर नियंत्रण व समन्वय ठेवते.या समिती मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रे,उपकेंद्रे,आयुष्यमान आरोग्य मंदिरे आणि ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाचा नियमित आढावा घेणे.औषधसाठा,वैद्यकीय उपकरणे,प्रयोगशाळा सुविधा आणि १०८ रुग्णवाहिका सेवा सुरळीत सुरू असल्याची खात्री करणे.आरोग्य संस्थांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय समन्वय वाढवून नागरिकांना दर्जेदार सेवा मिळवून देणे.महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि ‘आपला दवाखाना’ यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे आदी कामे करण्यात येतात.मात्र ही समिती केवळ बैठकीपुरतीच दिसून येत असल्याचे दिसत आहे.या समितीला जागे करण्याचे काम आज आ.काळे यांनी केले असल्याचे दिसून आले आहे.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी तहसीलदार महेश सावंत,गट विकास अधिकारी स्वप्नील वाळूंज,संदीप दळवी,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.गिरीश गुट्टे,तालुका आरोग्य अधिकारी विकास घोलप,सार्वजनिक बांधकाम अभियंता सीताराम दहीफळे,गटशिक्षणाधिकारी शबाना शेख आदींसह एकात्म आरोग्य वर्धिनी समितीचे सदस्य उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”वर्तमानात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले असून पावसाळ्यातील संभाव्य आजार पसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे आरोग्य विभागाने अलर्ट राहून यामध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणीसाठी सर्व फवारणी मशीनची दुरुस्ती करून घ्यावी व तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान त्यांनी आपल्या काळाचा आढावा घेताना म्हटले आहे की,”मागील पाच वर्षांत कोपरगाव तालुक्यात आरोग्य विभागासाठी जितकी कामे मंजूर करून आणली तितकी कामे यापूर्वी कधीच झाली नव्हती.पूर्वी केवळ घोषणा झाल्या मात्र प्रत्यक्ष कामे झाली नाहीत.सध्या कोपरगाव शहरात १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम वेगाने सुरू आहे.माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झाले आहे.याशिवाय संवत्सर येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असून संवत्सरचे प्राथमिक आरोग्य केंद्र कोकमठाण येथे स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे.सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालयात जातात.त्यामुळे तेथील आरोग्य व्यवस्था अत्यंत सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.नागरिकांसाठी पुरेशा प्रमाणात औषधे आणि लसीकरणासारख्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरूच राहणार असून आपण सर्व मिळून चारही बाजूने आरोग्य व्यवस्था बळकट करू.पावसाळ्यात डेंग्यूच्या डासांचे प्रमाण वाढू नये यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहून डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे.कोणत्याही रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना आ.काळे यांनी शेवटी दिल्या आहेत.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी स्वप्नील वाळूंज यांनी केले आहे तर सूत्रसंचलन सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार डॉ.गिरीश बुट्टे यांनी मानले आहेत.



