न्यायिक वृत्त
पतीची हत्या केल्या प्रकरणी आरोपी पत्नीसह दोघे निर्दोष !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील आरोपी पत्नीने अनैतीक संबंध प्रस्थापीत करून पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातुन आरोपी पत्नी पुजा जाधव व मित्र संदिप साळुंके यांची राहाता येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.डी.पाटील यांनी निर्दोष मुक्तता केली असल्याची माहिती ॲड.व्यंकटेश ख्रिस्ते यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

सदरच्या प्रकरणात सरकार पक्षातर्फे मयताचा भाऊ,प्रत्यक्षदर्शी साक्षीदार,वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकाऱ्यांसह एकुण ६ साक्षीदार तपासण्यात आल्या होत्या. आरोपी पुजा काळे हिचे वतीने ॲड.वर्षा धिवर-शेजवळ व आरोपी संदिप साळुंके यांचे वतीने ॲड.व्यंकटेश पंढरीनाथ खिस्ते यांनी कामकाज पाहीले होते.आरोपींच्या वतीने साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती व तपासातील त्रुटी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणुन देण्यात आल्या होत्या.त्यातून हा निकाल जाहीर झाला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,” कोरोना काळानंतर राज्यात आत्महत्येच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.त्यात प्रेमभंग,पती पत्नी वाद आदी कारणे असल्याचे उघड होत आहे.अशीच घटना राहाता तालुक्यातील अस्तगांव येथे दोन वर्षापूर्वी घडली होती.असतगाव येथील आनंद काळे याने पत्नी पुजा त्याचा मित्र संदिप साळुंके यांच्या विवाहबाह्य संबंधातुन आत्महत्या केल्याच्या आरोप करून त्याबाबत राहाता पोलिस ठाण्यात दि.१२ऑक्टोबर २०२४ रोजी गुन्हा रजि क्र.-४७०/२०२४ चा बी.एन.एस.कलम १०८,३५२,३५१(२) सह ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी उत्तर नगरसह राहाता तालुक्यात खळबळ उडाली होती.दरम्यान सदरच्या गुन्ह्यात आरोपींना राहाता पोलिसांनी अटक केली होती.

दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास करून याबाबतचे दोषारोप पत्र राहाता येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश यांचे न्यायालयात सेशन केस नं.०३/२०२५ अन्वये दाखल करण्यात आले होते.सदरच्या प्रकरणात सरकार पक्षातर्फे मयताचा भाऊ,प्रत्यक्षदर्शी साक्षीदार,वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकाऱ्यांसह एकुण ६ साक्षीदार तपासण्यात आल्या होत्या. आरोपी पुजा काळे हिचे वतीने ॲड.वर्षा धिवर-शेजवळ व आरोपी संदिप साळुंके यांचे वतीने ॲड.व्यंकटेश पंढरीनाथ खिस्ते यांनी कामकाज पाहीले होते.आरोपींच्या वतीने साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती व तपासातील त्रुटी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणुन देण्यात आल्या होत्या.तसेच प्रकरणातील उपलब्ध पुराव्यांवरून आरोपींनी गुन्हा केल्याचे कोणत्याही शक्यतेपलीकडे सिद्ध होत नाही व आरोपी निर्दोष असुन केवळ घरगुती वादातुन आरोपींना गुन्ह्यात गोवल्याचा युक्तीवाद करण्यात आला होता.
दरम्यान आरोपींच्या वतीने त्याचे समर्थनार्थ विवीध उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा दाखला देण्यात आला होता.सरकारी पक्षाचा व आरोपींच्या वतीने ॲड.वर्षा धिवर शेजवळ व ॲड.व्यंकटेश पंढरीनाथ खिस्ते यांनी जोरदार युक्तीवाद केला होता.आरोपींचा युक्तीवाद ग्राह्य धरून राहाता येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.डी.पाटील यांनी काल आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.या निकालाबाबत आरोपींनी समाधान व्यक्त केले आहे.



