जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
परिवहन विभाग

एस.टी.कर्मचाऱ्यांची नवी संघटना जाहीर !

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

    राज्यातील राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विविध मागण्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी विविध संघटना कार्यरत असताना आता सेवा शक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघ,महाराष्ट्र या संघटनेची भर पडली आहे.त्यात कोपरगाव आगारात २०२६-२७ ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.त्यात संतोष संभाजी टापरे-अध्यक्ष,ॲड.नितीन गंगावणे-कायदेविषयक सल्लागार,योगेश बन्सी माळी-सचिव आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

दरम्यान ही नवी संघटना आता कामगार हिताकरिता कार्यरत राहणार असून त्यांनी आपल्या मागण्यात मध्यवर्ती कार्यालय यांच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांकरीता कायमस्वरुपी थंड व शुद्ध पाण्याची व्यवस्था त्वरीत करणे,प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या नियमाचे पालन करुन वाहन सुस्थितीत करुनच मार्गस्थ करणे,वाहनांचे हॉर्न,इंडिकेटर, वायफर,हेडलाईट सुस्थितीत असल्याची खात्री करुनच वाहणे रेडी पार्क करणे,आलोकेशनबाबत पारदर्शकता व अचुक असावी,चालक वाहक यांच्या रजेचे अर्ज स्विकारुन रितसर ओ.सी.देण्यात यावी आदी मागण्या केल्या आहेत.

  

  राज्यातील एस.टी.कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना त्यांच्या समस्या मार्गी लागण्यासाठी कार्यरत असून त्यात प्रामुख्याने एस.टी.कामगार संघटना असून ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची मुख्य आणि सर्वात मोठी मान्यताप्राप्त संघटना मानली जाते.याशिवाय महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस.टी.कर्मचारी संघटना,कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना,संघर्ष कामगार संघटना,एस.टी.कर्मचारी काँग्रेस आणि महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेस यांसारख्या राष्ट्रीय कामगार युनियनच्या संलग्न संघटनाही महामंडळात कार्यरत आहेत.त्या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना आता माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि भाजपचे आ.गोपीचंद पडळकर यांनी या संघटना स्थापनेत पुढाकार घेतला असल्याचे दिसून येत आहे.त्यात त्यांनी कोपरगाव तालुका कार्यकारणी जाहीर केली आहे.त्यात वरील पदाधिकाऱ्यांशिवाय अन्य पदाधिकाऱ्यांत दत्तात्रय दादा काळेवाघ-सहसचिव,लक्ष्मण रघुनाथ पेंदोर-कार्याध्यक्ष,प्रमोद शाहुल सोनवणे-कोषाध्यक्ष,अशोक सुर्यभान रणधीर-सदस्य,संतोष देविदास पवार,संजय भोसले आदींचा समावेश आहे.तर केंद्रीय समितीत शरद कोल्हे यांचा समावेश असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   दरम्यान ही नवी संघटना आता कामगार हिताकरिता कार्यरत राहणार असून त्यांनी आपल्या मागण्यात मध्यवर्ती कार्यालय यांच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांकरीता कायमस्वरुपी थंड व शुद्ध पाण्याची व्यवस्था त्वरीत करणे,प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या नियमाचे पालन करुन वाहन सुस्थितीत करुनच मार्गस्थ करणे,वाहनांचे हॉर्न,इंडिकेटर, वायफर,हेडलाईट सुस्थितीत असल्याची खात्री करुनच वाहणे रेडी पार्क करणे,आलोकेशनबाबत पारदर्शकता व अचुक असावी,चालक वाहक यांच्या रजेचे अर्ज स्विकारुन रितसर ओ.सी.देण्यात यावी,चालक-वाहक यांचे रजा कोठा फलक प्रतिमा दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावी,चालक-वाहक यांचे स्पेअर रजिस्टर दररोज उपलब्ध करुन देणे व त्याची नोंद ठेवण्यात यावी,मध्यवर्ती कार्यालय यांचे सुचनेनुसार चालक-वाहक यांचे विश्रांती गृह स्वच्छ ठेवणे व त्या विश्रांतीगृहात त्वरीत कुलर उपलब्ध करुन द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय सदस्य शरद कोल्हे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close