परिवहन विभाग
उलट निकृष्ट बांधणाऱ्या लोकप्रतिनिधींचा दांभिकपणा उघड – आढाव

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
नगर जिल्ह्यात अन्य तालुक्यात चांगल्या सुविधा असणारी बसस्थानके निर्माण झाली असताना कोपरगाव शहरातील बस स्थानक निकृष्ट बांधणाऱ्या लोकप्रतिनिधींनी त्याच बसस्थानकात येऊन धाड घालण्याचे नाटक करून त्यांचा दांभिकपणा या घटनेमुळे उघड झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका निर्मला आढाव यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना काढला आहे.

“कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधण्यात आलेले कोपरगाव बसस्थानकाचे चुकीचे नियोजन करून प्रवाशांच्या अडचणी वाढविण्याचे काम माजी आ.कोल्हे यांनी केले आहे.आता धाड मारून काहीच उपयोग नाही. त्यावेळी योग्य नियोजन केले असते तर आता धाड मारायची वेळ आली नसती.हा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार असून केवळ फोटो सेशन आणि खोट्या प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे.या माध्यमातून प्रवाशांची आणि कोपरगावकरांची सहानुभूती मिळविण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न असून खोटा कळवळा दाखविणे ही कोल्हे यांची जुनीच खोड आहे”-निर्मला आढाव,नगरसेविका,कोपरगाव नगरपरिषद.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव बस स्थानकाची दुर्दशा खरोखरच अत्यंत चिंताजनक बनली आहे.प्रवाशांची होणारी गैरसोय,सुरक्षेचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या स्थानकाला अवकळा आली आहे,निकृष्ट बांधकामामुळे त्याचा उकिरडा बनला आहे.आगारातील अनेक बसेसची अवस्था दयनीय आहे.अलीकडेच फेब्रुवारी २०२६ मध्ये एका बसचे ब्रेक फेल झाल्याने ती थेट फलाटावर चढली होती,ज्यामुळे मोठा अनर्थ टळला तरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.गाड्यांच्या योग्य देखभाली अभावी प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत.नवीन व्यावसायिक इमारत असूनही परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरलेली असते.प्रवाशांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी, बसण्याची योग्य व्यवस्था आणि स्वच्छतागृहांची दुरावस्था यांमुळे महिला व वृद्ध प्रवाशांचे हाल होत आहे.ज्यांच्यामुळे हे सर्व झाले त्यांनीच दांभिकपणा करत या बस स्थानकाला नुकतीच भेट देऊन आपली योग्यता दाखवली असल्याचे प्रवाशांत बोलले जात आहे.त्यामुळे या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी अजित पवार (आ.काळे) गटाने आज नगरसेविका निर्मला आढाव यांचे नावे एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस देऊन हा आरसा दाखवला असल्याचे बोलले जात आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”ज्यावेळी शेजारच्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या शहरात बसस्थानक बांधले त्या बसस्थानकात करण्यात आलेल्या सोयी-सुविधांप्रमाणे कोपरगावचे पण बसस्थानक होईल अशी बसने प्रवास करणाऱ्या लाखों प्रवाशांना व कोपरगावकरांना भाबडी अपेक्षा होती.मात्र आपण चुकीचे बसस्थानक बांधून ठेवल्यामुळे त्याप्रमाणे काही घडलेच नाही आणि कोपरगावकरांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत.त्यामुळे हे बसस्थानक चुकीचे बांधणाऱ्या शिल्पकार तुम्हीच आता कशाला धाड घालता;त्यावेळीच बसस्थानक धड बांधले असते तर धाड टाकायची वेळच आली नसती असा चिमटा नगरसेविका निर्मला आढाव यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना काढला आहे.कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधण्यात आलेले कोपरगाव बसस्थानकाचे चुकीचे नियोजन करून प्रवाशांच्या अडचणी वाढविण्याचे काम माजी आ.कोल्हे यांनी केले आहे.आता धाड मारून काहीच उपयोग नाही. त्यावेळी योग्य नियोजन केले असते तर आता धाड मारायची वेळ आली नसती.हा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार असून केवळ फोटो सेशन आणि खोट्या प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे.या माध्यमातून प्रवाशांची आणि कोपरगावकरांची सहानुभूती मिळविण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न असून खोटा कळवळा दाखविणे ही कोल्हे यांची जुनीच खोड आहे.कोपरगाव शहरातील मोकळ्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी निधी आणला त्याप्रमाणे कोपरगाव बसस्थानका लगत व्यापारी संकुल उभारण्यासाठी निधी आणून व्यापारी संकुल उभारले आहे त्याचा फायदा कोपरगावकरांना होणार असून निश्चितपणे कित्येक व्यावसायिकांना व्यवसायाच्या संधी मिळणार आहे व कोपरगाव शहराची आर्थिक उलाढाल वाढणार आहे.त्याप्रमाणे आपण कोपरगाव शहराची बाजारपेठ फुलविण्यासाठी आपण बांधलेल्या या बसस्थानकाची भूमिका पण तेवढीच महत्वाची राहिली असती.बसस्थानकांच्या चहूबाजूंनी व्यापारी संकुल उभारून बसस्थानाकाला सुरक्षित कंपाऊंड पण मिळाले असते,कित्येक व्यावसायिकांना व्यवसाय करण्याच्या संधी मिळून कोपरगावची बाजारपेठ पण फुलली असती असे कित्येक उद्देश हे बसस्थानक योग्य पद्धतीने बांधले असते तर साध्य झाले असते.परंतु कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही,ज्यांच्याकडे विकासाच्या संकल्पना नाही,विकासाची दूरदृष्टि नाही नाही त्यांनी चुकीचे बसस्थानक बांधून ठेवले आणि आता धाड मारून स्वत:च्या चुकीवर कशाला पांघरून घालत आहेत असा टोलाअसल्याचे नगरसेविका निर्मला आढाव यांनी शेवटी लगावला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.



