गुन्हे विषयक
‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल,..या पोलिस ठाण्यात खळबळ!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील जमिनीचा हस्तलिखित नोंदीचा वाद अप्पर जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात सुरू असतानाच जमिनीचा ताबा घेण्याच्या कारणावरून दोन गटात वादावादी होऊन त्यात फिर्यादी चरपटीनाथ हनुमंता आहेर (वय-36 वर्ष) रा.भोजडे यांनी आरोपी गोकुळचंद दिपचंद पारख रा कनकुरी रोड,शिर्डी ता राहाता व सनी उर्फ सुनिल शिवाजी गायकवाड रा.गांधीनगर,कोपरगाव या दोघांसह अन्य 15-20 लोकांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात ‘ॲट्रॉसिटी’ चा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आरोपी गोकुळचंद पारख यास आमची जात माहिती असताना आम्हाला जमिनीच्या ताबा घेण्यावरून वाद उकरून काढून आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली आहे.त्यांचे सोबत 15 ते 20 लोकांनी पाच गाडयामध्ये येवुन,आमचे जमीनीमध्ये अनाधिकारने प्रवेश करुन,तुम्ही जमीन खाली करा,जमीन माझे मालकीची आहे,आम्हाला जमीनीचा ताबा घ्यायचा आहे” असे म्हणुन जातीवाचक शिवीगाळ दमदाटी करुन,मला चापटाने मारहान केली व जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचा गुन्हा फिर्यादी चरपटीनाथ आहेर याने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.
‘ॲट्रॉसिटी’ म्हणजे अनुसूचित जाती (एस.सी.) आणि अनुसूचित जमाती (एस. टी.) च्या व्यक्तींविरुद्ध केलेला अत्याचार किंवा क्रूर कृत्यासाठी हा गुन्हा दाखल केला जातो.यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ (एस.सी./एस. टी.प्रेवेन्शन ऑफ ‘ॲट्रॉसिटी’ॲक्ट,1989) अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो.राज्यात अनुसूचित जाती आणि जमातीवर हल्ल्यांच्या घटना वाढल्यानंतर शासनाने हा कायदा केला होता.मात्र अलीकडील काळात याचा दुरुपयोग होताना दिसून येत आहे.बऱ्याच वेळा अन्याय झालेला असतो.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीत घडली असल्याचे उघड झाले आहे.

यातील फिर्यादी चरपटीनाथ आहेर याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आमचे आजोबा संभा रामा आहेर व त्यांचे पाच भावांना भोजडे शिवारातील शेत गट नं 90 मधील 22 एकर जमीन ही सन-1988 साली शासनाकडुन कसण्यासाठी दिली होती.वर्तमानात तिचा ताबा माझे तसेच माझे चुलते तसेच भावबंद यांचेकडे आहे.सदर जमीनीसंदर्भातील हस्तलिखीत नोंदीचा वाद सन-2017 मध्ये गोकुळचंद दिपचंद पारख रा.कनकुरी रोड,शिर्डी यांचे सोबत झाला होता.परंतु त्याचा निकाल आमचे बाजुने लागला होता.सध्या गोकुळचंद दिपचंद पारख व आमचेमध्ये मालकी हक्क संदर्भात वाद अपर जिल्हाधिकारी,अहिल्यानगर यांचे कोर्टात चालु आहे.गोकुळचंद दिपचंद पारख यास आमची जात माहिती असताना आम्हाला जमिनीच्या ताबा घेण्यावरून वाद उकरून काढून आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली आहे.त्यांचे सोबत 15 ते 20 लोकांनी पाच गाडयामध्ये येवुन,आमचे जमीनीमध्ये अनाधिकारने प्रवेश करुन,तुम्ही जमीन खाली करा,जमीन माझे मालकीची आहे,आम्हाला जमीनीचा ताबा घ्यायचा आहे असे म्हणुन जातीवाचक शिवीगाळ दमदाटी करुन,मला चापटाने मारहान केली व जातीवाचक शिवीगाळ करून,’मी,तुमच्याकडे पाहुन घेतो” तसेच मला तसेच माझे भावबंद कडु मच्छींद्र आहेर,विजय मच्छींद्र आहेर,शिवनाथ जालींदर आहेर आदींना देखील जातीवाचक शिवीगाळ दमदाटी करुन निघुन गेले असल्याचे म्हटले आहे.दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाले असल्याची माहिती हाती आली आहे.
दरम्यान याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.123/2026,अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ 3(1) (आर) अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ 3(1) (एस),भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस. 329 (3) 2023
भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 115(2),भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023,352 6 भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 351 (2) अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे,अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती हे करीत आहेत.



