जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलगी पळवली,गुन्हा दाखल!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल झाल्याने संताप व्यक्त होत आहे.या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपींचा शोध लावून मुलीला पालकांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

महिला,मुलींसह युवक,पुरुष बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे.त्यांचा शोध घेण्यासाठी ठाण्यांमध्ये मिसिंग सेल सुरू करण्यात आले आहेत.तेथील अधिकारी,कर्मचारी मिसिंग व्यक्तीचा शोध घेण्याचे काम करतात.दिवसेंदिवस महिला व मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना पोलीस प्रशासनासमोर एक आव्हान ठरत आहे.दररोज एक तरी महिला किंवा मुलगी बेपत्ता होत असल्याने हा गंभीर मुद्दा बनला आहे.

   मागील काही वर्षापासून महिला तसेच मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत.यामुळे पालकांसह पोलीस प्रशासनाची चिंता वाढली आहे.विशेष म्हणजे अगदी तरुण वयात आलेल्या मुली देखील घरी काहीच न बोलता अचानक बेपत्ता होत असल्याने पोलिसांना देखील त्यांचा तपास करतांना मोठी अडचण येत आहे.गत वर्षी जिल्हाभरातून ७४ मुली तर यंदाच्या सहा महिन्यात ५४ मुली बेपत्ता झाल्याची पोलिस दत्परी नोंद करण्यात आली आहे.

  दरम्यान,बेपत्ता महिला,मुली या ह्यूमन ट्रैफिकिंगमध्ये जात असून हा जगातील सर्वात मोठा व्यवसाय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले होते.त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘मिसिंग सेल’ स्थापन करण्यात येत असून,त्याचे नेतृत्व एपीआय दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांकडे दिले जाणार असल्याचे सांगितले होते.फुस लावून पळवून नेलेल्या मुलींचा तपास याच सेलद्वारे केला जात आहे.महिला,मुलींसह युवक,पुरुष बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे.त्यांचा शोध घेण्यासाठी ठाण्यांमध्ये मिसिंग सेल सुरू करण्यात आले आहेत.तेथील अधिकारी,कर्मचारी मिसिंग व्यक्तीचा शोध घेण्याचे काम करतात.दिवसेंदिवस महिला व मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना पोलीस प्रशासनासमोर एक आव्हान ठरत आहे.दररोज एक तरी महिला किंवा मुलगी बेपत्ता होत असल्याने हा गंभीर मुद्दा बनला आहे.कोपरगाव शहर आणि तालुका त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उपनगरात रहिवासी असलेल्या पालकांनी  (वय-४३ वर्षे) याबाबत फिर्याद दिली असून त्यात त्यांनी आपली नुकतीच एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार केली आहे.तिचे वय १७ वर्षे ११ महिने २७ दिवस असल्याची माहिती आहे.तिला अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेली असल्याचे संशय व्यक्त होत आहे.याबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे.

  दरम्यान याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रमांक २०४/२०२६  भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दखल केलं आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close