गुन्हे विषयक
अवैध धंद्याविरुद्ध ग्रामसभा ठराव मंजूर,…या ग्रामस्थांचा आक्रोश !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रावंदे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय वाढल्याने संतप्त ग्रामस्थानी नुकतीच ग्रामसभा घेऊन सदर अवैध धंदे बंद करावे अशी एकमुखी मागणी करून त्याची प्रत नुकतीच कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत आणि तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांना दिले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा अवैध धंद्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे मानले जात आहे.

“रवंदे हद्दीतील अवैध धंदे त्यात आमली पदार्थ,दारु,गांजा,मटका,झुगार,पत्ते,सोरट आदी अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.त्यामुळे गावातील शांतता भंग होण्याची शक्यता वाढली आहे.त्यामुळे गावातील अवैध धंदे ग्रामस्थांनी धंदे कायम स्वरुपी बंद करण्यात यावे”-रवंदे ग्रामस्थ,तालुका कोपरगाव.
कोपरगाव शहर आणि तालुक्यातील गुन्ह्याचा आलेख सारखा वाढत असताना दिसत आहे.त्यामुळे सामान्य माणसांचे जगणे अवघड होत चालले आहे.अवैध वाळू उपशाच्या प्रश्नाने तर नेते आणि प्रशासनाच्या डोक्यावरून पाणी फिरले असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे याबाबत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.आशुतोष काळे हे अलीकडील काळात सातत्याने या प्रश्नावर आवाज उठवताना दिसत आहे.मात्र तरीही प्रशासन जागचे हलायला तयार असल्याचे दिसत नाही.त्यामुळे संतप्त होऊन आ.काळे यांनी या प्रश्नावर मार्च महिन्यात संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवला असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान त्यात त्यांनी कोपरगाव मतदारसंघातील अवैधपणे गौण खनिजाच्या होत असलेल्या उपशाकडे सभागुहाचे लक्ष वेधतांना सांगितले की,”कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरु असून ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे जमिनीचे उत्खनन सुरू आहे.परिणामी भूजल पातळी खोलवर गेली आहे.हा केवळ पर्यावरणाचा ऱ्हास नाही तर यातून मिळणाऱ्या अवैध पैशांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींचा मोठा वावर वाढला आहे.या पैशांच्या बळावर हे माफिया दहशत निर्माण करीत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे सभागृहांचे निदर्शनास आणून दिले आहे.त्यानंतर तरी कायदा सुव्यवस्था पूर्वपदावर येईल अशी नागरिकांची आशा आता एक महिन्यानंतर पुन्हा एकदा फोल ठरली असल्याचे दिसून आले आहे.कारण तसे नसते तर रवंदे येथील सरपंच आणि पदाधिकारी ग्रामस्थ यांनी त्याबाबत आवाज उठवला नसता.मात्र दुर्दैवाने घडले मात्र तसेच आहे.त्यांनी नुकतीच अवैध व्यवसायाबाबत दि.२२ एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा एक ग्रामसभा घेऊन हा निर्णय घेतला आहे त्यात ही मागणी केली आहे.
त्यांनी आपल्या ठरावात म्हटले आहे की,”रवंदे हद्दीतील अवैध धंदे त्यात आमली पदार्थ,दारु,गांजा,मटका,झुगार,पत्ते,सोरट आदी अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.त्यामुळे गावातील शांतता भंग होण्याची शक्यता वाढली आहे.त्यामुळे गावातील अवैध धंदे ग्रामस्थांनी धंदे कायम स्वरुपी बंद करण्यात यावे अशी मागणी केली आहे.त्याच्या प्रत कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांचे वतीने नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांना दिली आहे.तर कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांना त्याची प्रत दिली आहे.या ठरावावर सूचक म्हणून ऋषिकेश लक्ष्मण कदम तर अनुमोदक अनिल बाळासाहेब कदम हे आहे.त्यामुळे आता महसूल आणि पोलिस अधिकारी काय भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



