न्यायिक वृत्त
..या ठिकाणी लोकअदालतीत ११ हजार प्रकरणे निकाली !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव येथे नुकत्याच आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण १४ हजार ९३५ प्रकरणे ठेवण्यात आली त्यापैकी ११ हजार १८५ प्रकरणे निकाली निघाली त्यातून रक्कम ०४ कोटी ७५ लाख ५३ हजार ६३१ रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली असल्याची माहिती सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महात्मा गांधींच्या तत्त्वांवर आधारित ही अदालत सामान्यतः वर्षातून चार वेळा आयोजित केली जाते,जिथे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व दाखलपूर्व खटले विनामूल्य निकाली काढले जातात.या अदालतीचा उद्देश हा देशभर कोटीच्या संख्येत थोपलेले खटले निकाली काढणे व न्यायालयीन खटल्यांचा ताण कमी करणे,खटले जलद आणि आपापसात मिटवणे असा आहे.कोपरगावात १४ हजार ९३५ प्रकरणे ठेवण्यात आली त्यापैकी ११ हजार १८५ प्रकरणे निकाली निघाली त्यातून रक्कम ०४ कोटी ७५ लाख ५३ हजार ६३१ रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली आहे.
राष्ट्रीय लोक अदालत ही संपूर्ण भारतात एकाच वेळी भरविली जाणारी कायदेशीर यंत्रणा असून,ती न्यायालयीन खटले सामंजस्याने आणि जलद गतीने मिटवण्याचे काम करते.महात्मा गांधींच्या तत्त्वांवर आधारित ही अदालत सामान्यतः वर्षातून साधारणपणे मार्च,मे,सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये अशी चार वेळा आयोजित केली जाते,जिथे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व दाखलपूर्व खटले विनामूल्य निकाली काढले जातात.या अदालतीचा उद्देश हा देशभर कोटीच्या संख्येत थोपलेले खटले निकाली काढणे व न्यायालयीन खटल्यांचा ताण कमी करणे,खटले जलद आणि आपापसात मिटवणे असा आहे.यात दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे,तसेच बँक कर्ज,ट्रॅफिक चलान आणि ग्राहक तक्रारी यांसारखे विषय येथे चालवले जातात.या अदालत मध्ये वकील,न्यायाधीश आणि सामाजिक कार्यकर्ते आदींच्या मार्फत समेट घडवून आणला जातो.लोक अदालतीचा निर्णय हा दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंतिम आणि सर्व पक्षांवर बंधनकारक असतो.या निर्णयाविरुद्ध अपील करता येत नाही.परिणामी यात वेळेची आणि पैशांची बचत तर होतेच पण नागरिकांना त्यांची कोर्ट फी परत मिळते आणि वाद मिटल्यामुळे दोन्ही बाजूंचे संबंध सुधारतात त्यामुळे या लोकदलतीचा मोठा उपयोग होताना दिसून येत आहे.कोपरगाव येथे अशीच लोक अदालत मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

त्यावेळी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.डी.डी.आलमले,न्या.एस.सी.खैरनार,श्रीमती जे.एस.केळकर,वाय.जे.तांबोळी आदीसह तालुका विधी सेवा समितीचे कनिष्ठ लिपिक वाय.एस.म्हस्के,सरकारी वकील एस.एम.गुजर,अशोक एल.वहाडणे तसेच वकील संघाचे माजी अध्यक्ष अशोक टुपके आदी मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


