सण-उत्सव
…या ठिकाणी होळी सण उत्साहात संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव् यवस्थेच्या वतीने होळी हा स्थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.यावेळी श्री गुरुस्थान मंदिरासमोर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या धर्मपत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते होळीची विधीवत पुजा करण्यात येवून होळी पेटविण्यात आली आहे.

होळी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे,जो विशेषतः फाल्गुन महिन्यात साजरा केला जातो.हा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो.
होळी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे,जो विशेषतः फाल्गुन महिन्यात साजरा केला जातो.हा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो. हा सण प्रामुख्याने भक्त प्रल्हाद आणि त्याची मावशी होलिका यांच्या कथेवर आधारित आहे.भगवान विष्णूने नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला आणि प्रल्हादाचे रक्षण केले होते.शिर्डी येथे साईबाबा संस्थानच्या वतीने तो दरवर्षी संपन्न होत असतो.या वर्षीही तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

याप्रसंगी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे,प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले,अतुल वाघ,मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात,मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



