सण-उत्सव
कोपरगावात आज विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभ

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील सुभद्रानगर,निवारा येथे नुकत्याच नवरात्र उत्सवाच्या निमित्त संपन्न झालेल्याविविध स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ आज सायंकाळी 07 वाजेच्या सुमारास ओंकारा ब्लीसचे संचालक श्रीकांत दवंगे यांच्या हस्ते संपन्न होत असून त्यासाठी समता नागरिक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरविंद पटेल व संचालक जितेंद्र शहा यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती साई निवारा मित्र मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक जनार्दन कदम यांनी दिली आहे.

“नवरात्रोत्सव हा आदिशक्ती देवी दुर्गेची उपासना करणारा हिंदू धर्मातील एक प्रमुख आणि पवित्र उत्सव मानला जातो आहे.हा उत्सव आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत 11 ऑक्टोबर पासून ते 20 ऑक्टोबर पर्यंत सुभद्रानगर येथे सप्तशृंगी माता मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.दरम्यान उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा”-जनार्दन कदम,अध्यक्ष,साई-निवारा मित्र मंडळ,सुभद्रानगर,कोपरगाव.
नवरात्रोत्सव हा आदिशक्ती देवी दुर्गेची उपासना करणारा हिंदू धर्मातील एक प्रमुख आणि पवित्र उत्सव मानला जातो आहे.हा उत्सव आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत 11 ऑक्टोबर पासून ते 20 ऑक्टोबर पर्यंत सप्तशृंगी माता मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यानिमित्त राज्य पतसंस्थेचे कार्याध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व हस्ते आरती संपन्न होतं विविध गुणदर्शन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या आहेत.त्याचा बक्षिस वितरण समारंभ आज सायंकाळी 07 वाजता संपन्न होत आहे.

दरम्यान आज सप्तशृंगी मातेची आरती ओंकारा ब्लीसचे संचालक श्रीकांत दवंगे यांच्या हस्ते संपन्न होत आहे.या शिवाय या कार्यक्रमासाठी समता नागरिक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरविंद पटेल व संचालक जितेंद्र शहा,गिरीश सोनेकर,सुरेंद्र व्यास,योगेश आसने,बापूसाहेब इनामके,सतीश गर्जे,समता पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सचिन भट्टड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमास शहरातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.दरम्यान उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक जनार्दन कदम यांनी शेवटी केले आहे.


